ठेकेदाराला सहायक जिल्हाधिकारी यांचा दणका काळ्या यादीत टाकण्याचे लेखी पत्र
उपजिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे धुळे सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र
प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753
वाका चार रस्ता ते तळोदा तसेच तळोदा ते अक्कलकुवा रसत्याचे काम अद्यापही सुरु न झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी सार्वजानिक बांधकाम धुळे विभागाचे अभियंता यांना पत्र देऊन संबंधित कंटात्रदार यांना काळया यादीत टाकण्याचे आदेश पत्रा द्वारे निर्गमित केले आहेत....
राष्ट्रिय महामार्ग 753 ब दिनांक 18 डिसेंबर 2020 च्या बैठकीत 21 डिसेंबर पासून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल येईल असे संबंधित विभागाच्या प्रतिनिधीने सांगितले होते.
रस्त्याचे दुरुस्तीबाबत कोणतेही काम सुरू झाल्याचे दिसून येत नाही यापूर्वीही या विभागाला संदर्भीय पत्रामुळे सदर रस्त्याचे दुरुस्तीबाबत काम तात्काळ सुरू करावे असे वारंवार कळविण्यात आले होते. संबंधित कंत्राटदार यांच्याशी बोलणे झाले आहे.तरी देखिल रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही.ही अतिशय खेदजनक बाब आहे.
सदर रस्ता हा तळोदा अक्कलकुवा धड़गाव तालुक्याना जोड़नारा असून नंदुरबार ते तळोदा वाका चार रस्ता तसेच तळोदा ते अकक्लकुवा रस्त्यादरम्यान मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र आहे.सदर रस्ता हां पूर्णपणे धुळीने माखलेला आहे.तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साइड पट्या देखील खराब झाल्या आहेत.परिणामी धूळ डोळ्यात जाऊन अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
वारंवार कळविन्यात येवूनही संबंधित कंत्राटदार यांनी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केलेले नाहीं.त्यामुळे संबंधित कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.व् शासन नियमा नुसार योग्य ती कारवाई कंत्राटदाराविरुद्ध सुरु करण्यात यावी असे आदेशात म्हणटले आहे.....
*चौकट*
तळोदा ते वाका चार रस्ता अवघ्या 8 किमी अंतर असलेला रस्ता आहे परंतु रस्ता खराब असल्याने एवढे अंतर कापण्यास तासभर वेळ लागतो. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? असा प्रश्न उपस्थित होतो तीन तालुक्यांनाव दोन राज्यांना जोडणारा हां रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावर अवजड़ वाहनांचा वापर आहे. त्यामुळे दुचाकीस्वार तसेच लहान वाहनधारक यांना जिव मुठित धरून वाहन चालवावे लागत आहे.तसेच धुळीचे साम्राज्य आहे.तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्ण वाहिका यांना ही या रस्त्यांने प्रवाश करावा लागत आहे.
बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतोय. विशेष म्हणजे रूग्णाला उपचारासाठी नंदुरबार येथे हलवतांना रूग्णाचा नातेवाईकांना चार वेळा विचार करावा लागत असतो त्यातच वाळू वाहतूक करणार्या अवजड वाहनामुळे कधी कोणाचा अपघात होईल हे सांगता येत नाहीये
खरे तर हातोडा पूल बनल्यामुळे जनतेला नंदुरबार जाण्याची योग्य सोय झाली असतांना या बिकट रस्त्यांमुळे नंदुरबार पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत होता आता मात्र ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्या बाबत स्वतः सक्षम अधिकारी लेखी पत्र देत असल्याने बांधकाम विभाग किती निद्रिस्त अवस्थेत आहे याची प्रचिती येते मात्र आता या आदेशा मुळे असल्याने तरी पुढील रस्ता दुरुस्त होऊन प्रवास सुखकर होईल अश्या अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहेत,
कालीचरण सूर्यवंशी✒️
bhrashtachar ha ekane hot nasun hi mothi sakhali aahe samanya lokancha tras ha bhrastracaryana samjat nahi aplya lekhnitun hyana jage karat raha nahitar he nirllaja sada sukhi rahmat🙏
ReplyDelete