ऑन. लाईन सभेस काँग्रेस गट कडून विरोध जिल्ह्याधिकारी यांच्या कडे दाद मोकळ्या जागेत सभा घेण्याची मागणी

प्रतिनिधी तळोदा तळोदा नगरपरिषद च्या ऑन लाईन सभेस काँग्रेस च्या गट कडून लेखी स्वरूपात विरोध दर्शवत सुरक्षित अंतर ठेवून सभा घेणे बाबत मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांनी ६ ऑक्टोबर २०२० रोजी सर्वसाधारण सभेची सूचना नमुना अ अजेंडा प्रसिद्ध केला आहे. यात पालिकेची १४ ऑक्टोबर रोजी होणारी सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी 3 जुलै २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सभा घेत असल्याचे त्यात म्हटले आहे. परंतु व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने मागील झालेल्या सभेच्या अनुभव पाहता अनेक नगरसेवकांना आपले मत मांडण्याची संधी मिळाली नाही. तसेच आर्थिक स्वरूपाचे निर्णय घेण्यात आल्याचे आम्हाला कळले देखील नाही. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अनेकांना सभेत हजर होता आले नाही. परिणामी मत मांडण्याची इच्छा असून सुद्धा मत मांडता आले नाही. शासनाने वेळोवेळी नियमात शिथिलता आणली आहे. सर्व नियमांचे पालन करून नगर प...