Posts

Showing posts from 2024

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

Image
शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...! कालीचरण सूर्यवंशी     तळोदा  :  शहादा-तळोदा मतदार संघात विद्यमान आमदार राजेश पाडवी तर काँगेस कडून राजेंद्र गावित अशी सरळ लढत असल्याने काट्याची टक्कर समजली जात आहे. मात्र मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीचां अनुभव पाहता तिरंगी तसेच अपक्ष अशी झालेली आहे त्यामुळं कोण किती आणि कोणत्या उमेदवाराचे मत घेतात यावर निकाल ठरत होता मात्र मात्र यंदा एक अपक्ष वगळता हि लढत सरळ झालेली आहे. त्यामुळं निकालाचा दिवशी काय निकाल येतो या कडे उत्सुकता वाढली आहे .   विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ झालेले मतदान               एकूण पुरुष मतदार -१७५०४३ एकूण स्त्री मतदार - १७७५८८     एकूण इतर मतदार -५ एकूण मतदार -३५२६३६  झालेले मतदान पुरुष मतदार - १२१९५१ स्त्री मतदार - १२१४०८   इतर मतदार - ३ एकूण एकंदर झालेले मतदान २४३३६२ - (६९.0१%) लोकसभेत काँगेस आघाडीवर -      २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप चां डॉ हिना गावित या शहादा तळोदा मतदार संघात ...

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

Image
शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान  तर तळोदा शहरात किती झाले मतदान? तळोदा : राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे असणाऱ्या शहादा तळोदा मतदारसंघात एकूण 69.01% मतदान झाले आहे. शहादा तळोदा मतदारसंघात एकूण तीन लाख 52 हजार 636 एवढे मतदार होते. त्यापैकी दोन लाख 43 हजार 365 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.          2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहादा तालुका मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाडवी हे निवडणूक लढत होते तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस तर्फे राजेंद्रकुमार गावित हे निवडणूक लढवत होते याशिवाय एक अपक्ष उमेदवाराचा देखील या मतदारसंघात समावेश होता. मात्र सरळ लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती.           तळोदा तळोदा शहरात सकाळपासूनच मतदारांचा उत्साहात दिसून येत होता तळोदा शहरात एकूण 25 मतदान होत होती. विधानसभा मतदार संघातील यादीनुसार तळोदा शहरातील 25 मतदान बुथवर एकूण 26340 एवढे मत तर होते त्यापैकी 16619 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.       तळोदा शहरात बुथनिहाय झालेली मतदानाची संख्या ...

शहादा तळोदा मतदार संघासाठी दुपारी 1 वाजेपर्यत 40 टक्क्यांहून अधिक मतदान

Image
शहादा तळोदा मतदार संघासाठी दुपारी 1 वाजेपर्यत 40 टक्क्यांहून अधिक मतदान  शहादा :  राजाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतदारसंघ असणाऱ्या शहादा तळोदा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 40. 45% पर्यंत मतदान झाले आहे.          शहादा मतदार संघात एकूण 3 लाख 56 हजार 636 मतदार आहेत.त्यापैकी दुपारी एक वाजेपर्यंत 1 लाख 42 हजार 653 मतदारांनी आपला मतदानाच्या हक्क बजावला आहे यापैकी 69,418 पुरुष तर 73 हजार 234 महिलांनी मतदार केले.यात एक अन्य मतदाराच्या समावेश आहे.         शहादा-तळोदा मतदार संघात महायुतीकडून आमदार राजेश पाडवी हे निवडणूक लढवत आहे तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र कुमार गावित यांच्या सरळ लढत आहे याशिवाय अन्य एका अपक्षाने देखील आपले नशीब या निवडणुकीत आजमावले आहे.  
Image
पाच मतदान केंद्रावर एक दिवस अगोदरच पोहोचले कर्मचारी तळोदा: अक्कलकुवा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात नर्मदा नदीच्या काठापलीकडे वसलेल्या पाच मतदान केंद्रावर पाच मतदान पथके सोमवारी रवाना करण्यात आली. बार्जच्या सहाय्याने ही मतदान पथके मतदान बुथवर संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारात पोहोचली.       या मतदान केंद्रामध्ये मनीबेली,चीमलखेडी, बामणी, डनेल,मुखडी या पाच केंद्रांच्या समावेश आहे. या केंद्रांसाठी सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास अक्कलकुवा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून रवाना झाली प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातून या पथकांच्या पाच गाड्यांना हिरव्या झेंड्या दाखवून रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रात चार कर्मचारी समाविष्ट असून त्यांच्यासोबत पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास ही वाहने नर्मदा काठावर वसलेल्या मनीबेली गावापर्यंत जीपने पोहचली. तेथून पुढील प्रवास त्यांनी बार्जच्या सहाय्याने केला.         या पाचही पथकांसोबत मतदान बॅलेट युनिट,कंट्रोल युनिट,व्हीव्हीपॅड, आवश्यक मतदान स्टेशनरी,प्राथमिक आरोग्य कीट, अस...

तळोदा पालिकेच्या व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीच्या सामना

Image
प्रतिनिधी तळोदा  तळोदा पालिकेचा धूळखात पडलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याचां लिलाव झाला लाखो रुपये मोजून व्यापारी गाळे लोकांनी खरेदी केले मात्र त्यांचा आस्थापना साठी कोणतेही पार्किंग पालिकेने दिलेली नाही. तर व्यापारी गाळे दिले असले तरी त्यांचा बाजूला असणारे पालिकेचा दवाखाना अर्धवट बांधकाम चां असलेल्या ठिकाणी  असणारे काही अतिक्रमण काढण्यात आले मात्र त्याची कोणतेही स्वच्छता न ठेवली गेल्याने शहरात एक नवीन कचरा डेपो तयार झाल्याचे चित्र असून या परिसरात पोलीस निवास स्थाने मच्छी बाजार तसेच इतर व्यवसायिक व निवास स्थाने धान्य बाजार आहे शहरातील मध्यवर्ती जागेवर असणाऱ्या पालिकेचा मालकीच्या जागेवर असून नगर पालिका कार्यालय ला लागून असणाऱ्या ठिकाणी अतिशय घाण पसरली असून या भागात घाणीचा चिखल तसेच दुर्गंधी पसरली असून वराह ची अतिशय आवडती जागा झालेली आहे. याचा फटका परिसरातील व्यवसायिकांना बसत आहे तसेच लाखो रुपये ची लिलावात बोली लावून देखील गाळे धारकांना किमान स्वच्छता देखील उपलब्ध होत नसल्याने प्रचंड नाराजी गाळे मालकांचा मध्ये पसरली आहे. या बाबत पालिका प्रशासन तसेच आरोग्य विभाग देखील ...

तळोदा तापी पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
तळोदा दि. २० :तळोदा पाणी पुरवठा योजनेचे शहरात सुरु असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे               निवेदनाचा आशय असा, तळोदा शहरात सुरु असलेल्या बहुप्रतीक्षित ०.२ तळोदा पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, कॉग्रेसचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक यांनी मुख्याधिकरी यांना प्रतयक्षात भेटून व दूरध्वनी द्वारे तळोदा शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम हे निकृष्ठदर्जेचे होत आहे. सांगून देखील मुख्याधिकारी नगरपालिका यांनी अद्याप पावतो संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे गावातील गल्लोगली कॉलनीत ज्या ज्या ठिकाणी खोदकाम केलेल्या ठिकाणी दररोज अपघात होताना दिसत आहे. येत्या काही दिवसात आराध्यदैवत श्री गणराय आगमन घरोघरी होणार आहे तरी रस्त्याची खराब परिस्थिती बघता मोठमोठ्या मंडळाचे मुर्त्या त्या रस्त्यामुळे खंडित झाल्यास त्याला जवाबदार फक्त आणि फक्त संबंधित ठेकेद...

स्थानिक नेतृत्व नसतांना काँग्रेसचे मोठे यश.....शहादा तळोदा मतदार संघात भाजपची पीछेहाट ; भाजप संघटन व लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज

Image
स्थानिक नेतृत्व नसतांना काँग्रेसचे मोठे यश..... कार्यकर्ते नी घेतली जबाबदारी सुनिल सूर्यवंशी  नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँगेस चां विजय विशेष म्हणजे शहादा तळोदा मतदार संघात भाजपची झालेली पीछेहाट निश्चितच भाजप संघटन व लोकप्रतिनिधी यांना आत्मचिंतन करणारी आहे. भाजप कडे स्वतः.दोन वेळा खासदार म्हणून विजयी असणारे उमेदवार डॉ हिना गावित. राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित. जिल्हा परिषद विद्यमान अध्यक्षा सुप्रिया गावित. माजी मंत्री पद्माकर वळवी. आमदार राजेश पाडवी. विधान परिषद चे आमदार आमश्या पाडवी भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी तसेच जिल्हा मधील भाजप चे संपूर्ण आजी माजी जी. प .सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष अशी भली मोठी यंत्रणा असताना देखील. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतः अंगावर घेत ग्रामीण भागात काँग्रेस कडे जरी लोकप्रातीनिधी नसले तरी भाजप विरोधात काँगेस चां सर्व सामान्य कार्यकर्ता यांनी कोणतीही यंत्रणा पाठीमागे नसताना जोमाने काम केले.  तळोदा शहरात भाजप मतधिक्य देण्यात घेण्यास यशस्वी ठरली असली तरी अपेक्षित आघाडी मिळालेली नाही. तर ग्रामीण भागात भाजप मागे पडली असून काँग्रेस चे ...

खडसेंच्या घरवापसीनंतर माजी आमदार उदेसींग पाडवी यांच्या भूमिकेकडे लक्ष

Image
एकनाथ खडसे यांना निर्णय घेऊ द्या मग योग्य निर्णय घेऊ : माजी आमदार उदेसिंग पाडवी    तळोदा: माजी आमदार उदेसींग पाडवी  शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असणारे देशिंग पाडवी हे एकनाथराव खडसे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात एकनाथराव खडसे यांना ज्यावेळेस मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्यावेळेस संपूर्ण राज्यातून एकमेव असे आमदार होते त्यांनी खडसे यांच्या राजीनामा घेतल्यास आम्ही देखील राजीनामे देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली होती दरम्यान सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पवारागटाचे जिल्हाध्यक्ष आहेत एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांची एकंदरीत राजकीय वाटचाल पहावयास मिळते त्यामुळे एकनाथराव खडसे आता भाजपात जाणार असे स्पष्ट असताना याबाबत उदेसिंग पाडवी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारले असता त्यांनी सांगितले की, एकनाथराव खडसे आमचे मार्गदर्शक असून ते अद्याप पर्यंत भाजपात गेले नाहीत. ते भाजपात गेल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन चर्चा करून पुढील राजकीय वाटचाल ठरवू मात्र अद्याप असा कोणताही निर्णय घे...