खडसेंच्या घरवापसीनंतर माजी आमदार उदेसींग पाडवी यांच्या भूमिकेकडे लक्ष

एकनाथ खडसे यांना निर्णय घेऊ द्या मग योग्य निर्णय घेऊ : माजी आमदार उदेसिंग पाडवी 
 
तळोदा: माजी आमदार उदेसींग पाडवी शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असणारे देशिंग पाडवी हे एकनाथराव खडसे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात एकनाथराव खडसे यांना ज्यावेळेस मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्यावेळेस संपूर्ण राज्यातून एकमेव असे आमदार होते त्यांनी खडसे यांच्या राजीनामा घेतल्यास आम्ही देखील राजीनामे देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली होती दरम्यान सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पवारागटाचे जिल्हाध्यक्ष आहेत एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांची एकंदरीत राजकीय वाटचाल पहावयास मिळते त्यामुळे एकनाथराव खडसे आता भाजपात जाणार असे स्पष्ट असताना याबाबत उदेसिंग पाडवी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारले असता त्यांनी सांगितले की, एकनाथराव खडसे आमचे मार्गदर्शक असून ते अद्याप पर्यंत भाजपात गेले नाहीत. ते भाजपात गेल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन चर्चा करून पुढील राजकीय वाटचाल ठरवू मात्र अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पाडवी यांनी बोलताना सांगितले.उदेसिंग पाडवी हे शहादा-तळोदा मतदार विधानसभा संघात आमदारकी लढविण्यासाठी अजूनही इच्छुक असून याबाबत वेळोवेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.मात्र,त्यांचे सुपुत्र राजेश पाडवी हे विद्यमान आमदार असून त्यांच्यासमोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करायची की त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मार्गदर्शन करायचे याबाबत आता पाडवी काय निर्णय घेतात याकडे शहादा तळोदा नव्हे तर नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
           दरम्यान बाजार समिती बाबत त्यांना विचारणा केली असता तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पद मी खूप वर्ष  राहिलो असून तळोदा बाजार समिती स्थापन करण्या पासून ते  बाजार  समितीची  आर्थिक प्रगती करण्यासाठी मी खूप झटलो आहे . आज बाजार समिती उत्तम स्थितीत असून त्या पदावर पुन्हा बसण्यास खूप रस नाही.


Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी