स्थानिक नेतृत्व नसतांना काँग्रेसचे मोठे यश.....शहादा तळोदा मतदार संघात भाजपची पीछेहाट ; भाजप संघटन व लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज







स्थानिक नेतृत्व नसतांना काँग्रेसचे मोठे यश.....
कार्यकर्ते नी घेतली जबाबदारी

सुनिल सूर्यवंशी 

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँगेस चां विजय विशेष म्हणजे शहादा तळोदा मतदार संघात भाजपची झालेली पीछेहाट निश्चितच भाजप संघटन व लोकप्रतिनिधी यांना आत्मचिंतन करणारी आहे.
भाजप कडे स्वतः.दोन वेळा खासदार म्हणून विजयी असणारे उमेदवार डॉ हिना गावित. राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित. जिल्हा परिषद विद्यमान अध्यक्षा सुप्रिया गावित. माजी मंत्री पद्माकर वळवी. आमदार राजेश पाडवी. विधान परिषद चे आमदार आमश्या पाडवी भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी तसेच जिल्हा मधील भाजप चे संपूर्ण आजी माजी जी. प .सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष अशी भली मोठी यंत्रणा असताना देखील. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतः अंगावर घेत ग्रामीण भागात काँग्रेस कडे जरी लोकप्रातीनिधी नसले तरी भाजप विरोधात काँगेस चां सर्व सामान्य कार्यकर्ता यांनी कोणतीही यंत्रणा पाठीमागे नसताना जोमाने काम केले.

 तळोदा शहरात भाजप मतधिक्य देण्यात घेण्यास यशस्वी ठरली असली तरी अपेक्षित आघाडी मिळालेली नाही.
तर ग्रामीण भागात भाजप मागे पडली असून काँग्रेस चे गोवाल पाडवी यांना आघाडी मिळाली असून काही ठिकाणी संपूर्ण गावाचे गाव काँगेस कडे दिसून येत आहेत. या मूळ निश्चितच १० वर्ष पूर्वी भाजपने काँगेस चां मतदार भाजप कडे वळविला होता तो पुन्हा काँगेस कडे जाताना स्पष्टपने दिसत आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणूक असो की पालिका निवडणूक साठी हि आकडेवारी चिंतेची बाब आहे. प्रत्येक निवडणुकी हि वेगळी असते हे सत्य असले तरीही विधानसभा निवडणूक आवघ्या तीन चार महिन्यात होतील त्यामुळं हाच ट्रेड चालू नये या साठी भाजप संघटन ल अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.


हे मुद्दे ठरले महत्वाचे -
आठ हजार रुपये महिना सुरू होणार.
एक लाख वर्ष काठी भेटणार.
संविधान बदलल जाणार असल्याची चर्चा.मणिपूर प्रकरण.
आरक्षण रद्द होणार ची अफवा.
 विकास कामात ग्रामीण भागात असणारी राजकीय ठेकेदारी मधील स्पर्धा. स्थानिक ग्रामीण भागातील राजकारण.
निधी वाटप करताना झालेले आसंतुलन.

सोशल मीडिया ठरला परिणाम कारक -
२०१४. व २०१९ मध्ये ज्या पद्धतीने फेसबुक व्हाटस् एप वर
भाजप कडून अतिशय प्रभावी पने प्रचार यंत्रणा राबविली गेली त्याचा प्रचंड फायदा भाजप पक्ष ने घेतला मात्र या वेळी ग्रामीण भागात मणिपूर प्रकरन. संविधान बदलले जाणार असल्याचा विविध पोस्ट. ग्रामीण भागातील स्थानिक विषय या बाबत सोशल मीडिया मधून प्रतिउत्तर देण्यास भाजप अपयशी ठरल्याचे देखील बोलले जाते

नेतृत्व नसताना कार्यकर्ते काँगेस लढले -
कॉंग्रेस कडे जिल्हय़ात नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत,जिल्हा अध्यक्ष कोण आहे ? ते अनेकांना नाव माहित नाही. तालुका अध्यक्ष सक्रिय नाही. कॉंग्रेस ची सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते सगळे हवे तेवढ्या उमेदीने सहभागी नसताना कॉंग्रेस चा खासदार निवडून येतो म्हणजे काय समजावे ? काँग्रेसची खरच राजकीय ताकद होती की, भाजपाला मतदार कंटाळले,की,भाजपा उमेदवाराचा नाराजीचा वचपा मतदारांनी काढला?
        जनमानसात भाजपा विरुद्ध काँग्रेस नकारात्मकता तयार करण्यात यशस्वी झाले.संविधान बदलणार ,आरक्षण रद्द होणार,मणीपूर घटना, समाजावर ठिकठिकाणी होणारे अन्याय, जनतेचा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत ,काँग्रेस पार्टिकडून लोकांना शोसल मीडिया वरून अनेक पोस्ट ज्या प्रभावी ठ रल्या ,मराठा आरक्षण,मुस्लीम मतदार ,डीलिस्टींगसाठी भाजपाचे आंदोलन,या नाराजीमुळे भाजपाला फटका बसला आहे .


 भाजप संघटन साठी आत्मचिंतन ची गरज -
भाजप संघटन कडून निवडणुकी पूर्वी मीटिंग आणि बेठका घेण्यात आल्या बूथ प्रमुख पासून पंना प्रमुख पावेतो मीटिंग असंख्य वेळा घेण्यात आल्या तरीही प्रत्यक्ष शहर आणि ग्रामीण भागात संबधित पदाधिकारी मतदार राजाला आपल्या कडे वळवू शकले नाही.
यात काही ठिकाणी अती आत्मविश्वास देखील नडला.

तळोदा तालुक्यात भाजपचा डॉ हिना गावित यांना२६ हजार २०५ तर
ाँग्रेस चे गोवाल पाडवी यांना४७ हजार २४२ इतकी मते पडली तर तळोदा शहरात भाजप पक्षास ९ हजार १२८
तर ६ हजार ५८३ मते मिळाली
मागील आकडेवारी पाहता भाजपची पीछे ाट
दिसत असून या बाबत पक्ष पदाअधिकारी म्हणतात की भाजप कडून संपूर्ण भागात असाच ट्रेण्ड चालला असल्याने आम्ही हतबल आहोत असे उत्तर दिले एकूणच आकडेवारी पाहता काँग्रेस ची सुप्त लाट ओळखण्यास भाजप संघटन अपयशी ठरले असे दिसते.

 शहरात काँगेस चे कोणी पदाधिकारी नाही राष्ट्रवादी शरद पवार गट उबाथा शिवसेना यांनी एकत्रित येऊन काम केलं यात त्यामुळं आपल्या प्रभाग मधून भाजप कडे जाणारे काही मते आपल्या कडे वळविण्यास निश्चितच त्यांना यश आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?