तळोदा तापी पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तळोदा दि. २० :तळोदा पाणी पुरवठा योजनेचे शहरात सुरु असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे
निवेदनाचा आशय असा, तळोदा शहरात सुरु असलेल्या बहुप्रतीक्षित ०.२ तळोदा पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, कॉग्रेसचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक यांनी मुख्याधिकरी यांना प्रतयक्षात भेटून व दूरध्वनी द्वारे तळोदा शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम हे निकृष्ठदर्जेचे होत आहे. सांगून देखील मुख्याधिकारी नगरपालिका यांनी अद्याप पावतो संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे गावातील गल्लोगली कॉलनीत ज्या ज्या ठिकाणी खोदकाम केलेल्या ठिकाणी दररोज अपघात होताना दिसत आहे. येत्या काही दिवसात आराध्यदैवत श्री गणराय आगमन घरोघरी होणार आहे तरी रस्त्याची खराब परिस्थिती बघता मोठमोठ्या मंडळाचे मुर्त्या त्या रस्त्यामुळे खंडित झाल्यास त्याला जवाबदार फक्त आणि फक्त संबंधित ठेकेदार व मुख्याधिकारी हे असतील तसेच ऐन पावसाळ्यात खोदकाम केल्यामुळे त्या ठिकाणी साचत असलेल्या पाण्यामुळे लोकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे. मच्छरांच्या मोठ्या प्रमाणामुळे हैदोस झाला आहे व त्यामुळे घरोघरी डेंग्यू, मलेरिया सारखे रुग्ण मिळून येत आहे, अश्या बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यावर आपल्या मार्फत चोकशी समिती नेमून येत्या ८ दिवसात योग्य ती कार्यवाही करावी. जेणेकरून तळोदा शहरातील नागरिकांचे हाल होणार नाही, व निकुष्ठ काम करणार्यावर चाप बसेल, असे न केल्यास आम्ही खाली सह्या करणारे भारतीय जनता पार्टी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी .... पार्टी, सर्व नगरसेवक व नगरपालिकेच्या मुख्यधिकारी दालनासमोर उपोषणास बसू, होणाऱ्या सर्व नगरपालिका प्रशासन जवाबदार राहील याची नोद घ्यावी.निवेदनावरयोगेश प्रभाकर चौधरी - ( माजी शहराध्यक्ष भाजपा), योगेश शांताराम मराठे
( शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)जितेंद्र शिवकुमार दुबे ( शिवसेना शहर प्रमुख)संदीप गोपालदास परदेशी ( जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी) प्रतिक्षा जितेंद्र दुबे माजी नगरसेविका,भाग्यश्री योगेश चौधरी (माजी उपनगराध्यक्ष) अनिता संदीय परदेशी (माजी नगरसेविका) हितेंद्र सरवनर्सिंग क्षत्रिय
(माजी नगरसेवक ) बेबीबाई हिरालाल पाडवी (माजी नगरसेविका) हेमलाल पुरुषोत्तम मगरे (माजी स्विकृत नगरसेवक ), प्रदीप वासुदेव शेंडे (माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भाजपा, सुरज रमेश माळी (शिवसैनिक), आनंद महेंद्र सोनार (उपजिल्हाप्रमुख शिवसेना),अमानोद्दीन फकरुद्दीन शेख (माजी नगरसेवक ) रामानंद शिरीषकुमार ठाकरे ( माजी नगरसेवक ), दिपक हिरालाल पाडवी (सामाजिक कार्यकर्ता)धनराज विजय पाडवी ( युवामोर्चा जिल्हा नंदुरबार),अरविंद बबन प्रधान (जिल्हा युवामोर्चा सदस्य नंदुरबार) आदिंच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment