तळोदा पालिकेच्या व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीच्या सामना
प्रतिनिधी तळोदा
तळोदा पालिकेचा धूळखात पडलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याचां लिलाव झाला लाखो रुपये मोजून व्यापारी गाळे लोकांनी खरेदी केले मात्र त्यांचा आस्थापना साठी कोणतेही पार्किंग पालिकेने दिलेली नाही. तर व्यापारी गाळे दिले असले तरी त्यांचा बाजूला असणारे पालिकेचा दवाखाना अर्धवट बांधकाम चां असलेल्या ठिकाणी
असणारे काही अतिक्रमण काढण्यात आले मात्र त्याची कोणतेही स्वच्छता न ठेवली गेल्याने शहरात एक नवीन कचरा डेपो तयार झाल्याचे चित्र असून या परिसरात पोलीस निवास स्थाने मच्छी बाजार तसेच इतर व्यवसायिक व निवास स्थाने धान्य बाजार आहे शहरातील मध्यवर्ती जागेवर असणाऱ्या
पालिकेचा मालकीच्या जागेवर असून नगर पालिका कार्यालय ला लागून असणाऱ्या ठिकाणी अतिशय घाण पसरली असून या भागात घाणीचा चिखल तसेच दुर्गंधी पसरली असून वराह ची अतिशय आवडती जागा झालेली आहे. याचा फटका परिसरातील व्यवसायिकांना बसत आहे तसेच लाखो रुपये ची लिलावात बोली लावून देखील गाळे धारकांना किमान स्वच्छता देखील उपलब्ध होत नसल्याने प्रचंड नाराजी गाळे मालकांचा मध्ये पसरली आहे. या बाबत पालिका प्रशासन तसेच आरोग्य विभाग देखील लक्ष देत नसल्याने
पालिकेचा कोणी वाली आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
जागा रिकामी का ?
या जागेवर पूर्वी पालिकेचा मालकीच्या दवाखाना होता मात्र तो जीर्ण झाल्याने त्याला पाडण्यात आले १९८५ साली तत्कालीन सत्ताधारी कडून यू. डी. सिक्स.योजेने अंतर्गत नूतन दवाखाना बांधण्यासाठी कर्ज घेण्यात आले. मात्र दवाखाना पूर्णत्वास येऊ शकला नाही. १९८९ साली पालिकेत सत्तातंतर झाले या विषय कडे दुर्लक्ष झाले पुन्हा २००७ साली नवीन सत्ताधारी बसले व
त्यांनी शासन कडे मागणी केली मात्र या काळात तळोदा इथ उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने शासन कडून आरोग्य कर्मचारी देण्यास नकार दिला. त्यामुळं हा विषय मागे पडला आणि या ठिकाणी विविध पक्षाचा राजकीय व्यक्ती कडून अतिक्रमण वाढत गेले. पालिकेला त्याच कोणतेही भाड न देता या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी व्यवसाय थाटले आज पालिकेने काही अतिक्रमण काढले काही अजूनही शिल्लक आहे आहेत
दरम्यान एकूणच लाखो रुपये बोली लावून गाळे विकत घेतले मात्र पालिका प्रशासन चे कोणतेही नियोजन या बाबत नसल्याने स्वच्छता होत नाही
पालिकेचा व्यापारी गाळ्यात एकही स्वच्छता गृह नाही -
करोडो रुपये निधीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या नूतन संकुलात एकही स्वच्टता गृह नसल्याने आश्चर्य व्यक्त येत आहे कारण अश्या तांत्रिक दृष्ट्या बांधकाम असणाऱ्या संकलुची तांत्रिक मंजुरी कशी मिळाली ? तसेच लिलाव झाल्यावर देखील हि सोय का उपलब्ध करून देण्यात आली नाही हा संशोधनाचा विषय आहे.
प्रतिक्रिया
तळोद्याचा रहिवाशी असुन मी नुकत्याच नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गाळा क्र 79 घेतला आहे
तरी माझा गाळ्याच्या बाजूला मोकळी जागा आहे तिथे कित्येक वर्षांपासून घाणीचे साम्राज्य म्हणजे उर्किर्डा चे स्वरूप निर्माण झाले आहे खुप घाणेरडा वास येतो त्या वासामुळे आमचे
आरोग्य धोक्यात येत आहे भरपूर दा निवेदन देऊन सुध्दा तिथला कचरा उचलला जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग ची सोय नाही लोक आमचा दुकानासमोर गाड्या लावून खुशाल निघुन जातात पालिका प्रशासन आमचा कडे दुर्लक्ष करते असे उत्तर दिले जाते हो मानस पाठवतो
पवन भोई
व्यवसायिक
Comments
Post a Comment