नंदुरबार जिल्ह्यासाठी 16 रुग्वाहिकेची मागणी
तळोदा: जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेषत: प्रसुती, हार्ट अटक अश्या तत्काळ सुविधेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या 16 रुग्णवाहिकेची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहे.
नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यावश्यक अश्या १६ नवीन रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य अधिकारी एस, बी, बोडके यांनी मागणी राज्याचे संचालक यांच्याकडे केली आहे,
जिल्हात असणाऱ्या रुग्णवाहिकाची मर्यादा संपत आली असून अनेक रुग्णवाहिका जीर्ण अवस्थेत आहेत, त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा इतर ठिकानाहून रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी अडचणी येतात तसेच अनेक दुर्गम भागात गैरसोय होते, नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या मागणी ला प्राधान्य देऊन रुग्णवाहिका खालील आरोग्य केंद्रात उपलब्द करण्यात याव्यात अशी लेखी मागणी करण्यात आली आहे,
मागणी अशी -
नंदुरबार -
राकस वाडा, कोपर्ली, भालेर, ३
नवापूर -
डोंगेगाव प्रतापपुर २
शहादा,-
पुरोषत्तम नगर, राणीपूर, २
तळोदा-
वाल्हेरी प्रतापपूर २
धडगावं -
झापी, बिलगाव, राजबर्डी, ३
अक्कलकुवा - डाब, जंगठी,खापर, वाण्याविहिर, ४ एकूण १६ दरम्यान लवकरच या नवीन रुग्णवाहिका जिल्हातील सर्व तालुक्यात दाखल होतील,
योग्य विषय सविस्तर मांडला, ग्रेट.
ReplyDelete