स्थानिक नेतृत्व नसतांना काँग्रेसचे मोठे यश.....शहादा तळोदा मतदार संघात भाजपची पीछेहाट ; भाजप संघटन व लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज

स्थानिक नेतृत्व नसतांना काँग्रेसचे मोठे यश..... कार्यकर्ते नी घेतली जबाबदारी सुनिल सूर्यवंशी नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँगेस चां विजय विशेष म्हणजे शहादा तळोदा मतदार संघात भाजपची झालेली पीछेहाट निश्चितच भाजप संघटन व लोकप्रतिनिधी यांना आत्मचिंतन करणारी आहे. भाजप कडे स्वतः.दोन वेळा खासदार म्हणून विजयी असणारे उमेदवार डॉ हिना गावित. राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित. जिल्हा परिषद विद्यमान अध्यक्षा सुप्रिया गावित. माजी मंत्री पद्माकर वळवी. आमदार राजेश पाडवी. विधान परिषद चे आमदार आमश्या पाडवी भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी तसेच जिल्हा मधील भाजप चे संपूर्ण आजी माजी जी. प .सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष अशी भली मोठी यंत्रणा असताना देखील. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतः अंगावर घेत ग्रामीण भागात काँग्रेस कडे जरी लोकप्रातीनिधी नसले तरी भाजप विरोधात काँगेस चां सर्व सामान्य कार्यकर्ता यांनी कोणतीही यंत्रणा पाठीमागे नसताना जोमाने काम केले. तळोदा शहरात भाजप मतधिक्य देण्यात घेण्यास यशस्वी ठरली असली तरी अपेक्षित आघाडी मिळालेली नाही. तर ग्रामीण भागात भाजप मागे पडली असून काँग्रेस चे ...