तळोदा पोलिस प्रशासनाने चोरीचा तपास गतिमान करण्यासोबतच राजकिय दबावाला बळी न पडण्याची गरज

कालीचरण सूर्यवंशी तळोदा शहरात दिवसा ढवळ्या एक शिक्षकाचा घरी घरफोडी झाल्याने शहरातील नवीन वसाहती मध्ये भीतीचे सावट पसरले असून पोलिसांचं भयच आता चोरांना राहिले नाही की काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे. तळोदा शहरात नवीन वसाहत परिसरात दरवर्षी घरफोडी होत असते त्या चोरीचा तपासात किती गुन्हाच छडा लागतो किती मुद्देमाल सापडतो हा निश्चितच शोधाचा विषय आहे. तळोदा तालुका पोलिस स्टेशन मध्ये खूप दिवसांनी पूर्ण वेळ पोलीस निरीक्षक लाभला असून त्यांचे स्वागत जरी दिवसा ढवळ्या झालेल्या धाडसी चोरीने आज्ञात चोरट्यांनी केले असले तरी पहिल्याच दिवशी रुजू झाल्या नंतर मुख्य रस्त्यावरील दुचाकी वर कार्यवाही करत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला . तसेच शाळा महविद्यालयात भेटी देवून समस्या जाऊन घेत थेट संपर्क व थेट कार्यवाही होवु शकते याचा नमुना दाखवला असला तरी नुसते आरंभ म्हणून कार्यवाही नको तर त्यात सात्यत असल्याशिवाय शिस्त लागणार नाही . राजकीय दबावाला झुगारून शहरात कडक शिस्त लावावी - तळोदा शहरात कायदा काही ठर...