माजी-आजी आमदार पिता-पुत्राच्या भूमिकांमुळे तळोदा बाजार समिती होणार राज्यांत लक्षवेधी

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला माजी-आजी आमदार पिता-पुत्राच्या भूमिकांमुळे तळोदा बाजार समिती होणार राज्यांत लक्षवेधी तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ठरविणार तळोदा शहरातील राजकीय भविष्य..... कालीचरण सूर्यवंशी तळोदा येथील शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम आज नव्याने जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या २८ एप्रिलला मतदान आहे. मतदान झाल्यापासून पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. दरम्यान आजी माजी आमदार यांच्यात अर्थात पिता-पुत्र यांच्यात सामंजस्याने मार्ग निघतो की निवडणूक होते याकडे लक्ष लागले आहे. शेती उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजार समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ठ होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपं...