तळोद्यात विषय समित्यांचे धक्कादायक निकाल



कालीचरण सूर्यवंशी ✒️

         पालिकेच्या विविध विषय समित्यांचा झालेल्या निवड प्रक्रियेत बांधकाम सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदी सुनैना उदासी यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार गिरीष वखारे यांनी घोषित केले.

  या बैठकित भाजपचे गटनेते भास्कर मराठे, सुनैना उदासी हे उपस्थित होते. तर काँग्रेसचे गटनेते गौरव वाणी, संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, कल्पना पाडवी, काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक जितेंद्र माळी यासह शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे उपस्थित होते. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणुकित भाजपच्या सत्ताधारी पक्षाचे ९ नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभापती पदाची निवड बिनविरोध झाली. पालिकेचे कर्मचारी  राजेंद्र माळी अश्विन परदेशी नितीन शीरसाठ यांनी काम पाहिले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी सभेवर लक्ष ठेवून होते... 



        विशेष समिती निवड सभा रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र कायद्यात तरतूद नसल्याने नियमानुसार सभा रद्द करण्यात संबंधितांना अपयश आल्याचे बोलले जात आहे.. 


 सत्ताधारी पक्षा कोंडी करण्यात उदयसिंग पाडवी  यशस्वी-       

         नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, अमान्नूदिन शेख, सविता नितीन पाडवी, सुरेश पाडवी, योगेश पाडवी, शोभा जालंधर भोई, अंबिका शेंडे, बेबीबाई पाडवी हे सभेस अनुपस्थित होते. दरम्यान सदर स्थायी समिती सभापती निवड प्रक्रियेत गटनेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष यांच्या गोटात गेल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अनुपस्थित राहावे लागल्याची नामुष्की ओढवल्याने चर्चेचा विषय ठरला....





 

          गटनेते म्हणून भाजपचा नगरसेवकांची नावे सुचवली होती. दरम्यान 9 सदस्य या महत्वपूर्ण बैठकीत अनुपस्थिती असल्यामुळे बांधकाम सभापतीपद काँग्रेसकडे गेले.. 

भास्कर मराठे

गटनेते भाजपा



          काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदमाकर वळवी तसेच जेष्ठ नेते भरत माळी यांच्या सूचनेनुसार दोन दोन नावे गटनेता म्हयांनीणून सुचवले होते. भाजपकडे बहुमत असताना ते गैरहजर राहिल्याने काँग्रेसला सभापती पद मिळाले... 


गौरव वाणी

गटनेता काँग्रेस



  भाजपचे गटनेते भास्कर मराठे यांनी आरोग्य सभापती पदासाठी भाजपचे योगेश पाडवी व पाणी पुरवठा सभापती पदासाठी रामानंद ठाकरे यांचे नाव सुचविले होते. नियोजन समिती, पाणीपुरवठा समिती, व स्वच्छता समितीचे नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी नसल्याने ३ अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे पिठासिन अधिकारी गिरीश वखारे  सांगितले..




 काँग्रेस, राष्ट्रवादी, व शिवसनेना यांना प्रत्येकी 1 समिती व भाजप पक्षास 3 सभापती देण्याचा मी    प्रस्ताव मांडला होता.मात्र नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी  गैर अर्थ काढून भाजपच्या नगरसेवकांना चुकीचे मार्गदर्शन केले. त्यामुळे आजचा सभेत सर्व मंडळी गैरहजर होती. अजय परदेशी यांनी वेगळीच चूल मांडल्यामुळे त्यांना समितीच्या सभापती पदांपासून वंचित राहावे लागले. राष्ट्रवादीचा हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त असे सांगून काँग्रेस पक्षाकडे एक समिती सभापती निवडीसाठी संधी होती. मात्र त्यांनी स्वतः ती घालवली आहे. यापुढेही काँग्रेस सोबत आली तर ठीक अन्यथा शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित पालिका लढवेल असा इशारा यावेळी दिला....

       उदेसिंग पाडवी

राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष



 स्थायी समिती -

सभापतीअजय परदेशी 

सदस्य सौ.भाग्यश्री चौधरी 

सौ.सुनयना उदासी

हितेंद्र क्षत्रिय


 नियोजन व विकास समिती- सभापती सौ.भाग्यश्री चौधरीसौ.बेबीबाई पाडवीसौ.सविता पाडवी


 सार्वजनिक बांधकाम समिती

सभापती हितेंद्र क्षत्रिय सदस्य भास्कर मराठे सुरेश पाडवीअमानुद्दीन शेखसौ.अनिता परदेशी


महिला व बालकल्याण समिती -

सभापती सौ.सूनयना उदासी

सदस्य सविता पाडवी शोभा भोई अनिता परदेशी कल्पना पाडवी


स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक समिती व पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती अश्या एकूण 6 समितीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणी अंती नामनिर्देशन पत्रावर गटनेत्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने 3 नामनिर्देशन पत्र अवैद्य ठरविण्यात आले...


 तळोदा पालिकेत विषय समित्यांचा निवडणुकीत काँग्रेस कडे सभापती पद जाणार व गटनेत्यांची भूमिका महत्वाची असणार असे भाकीत केले होते ते आज सत्य ठरले असून भाजपची सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या वाटेवर असणारे काँग्रेसचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व शिवसेनेच्या वाटेवर असणारे अनूप उदासी यांच्या पत्नी नगरसेविका सूनयना अनूप उदासी यांच्या कडे सभापती पद गेल्याने राजकिय अंदाजे उतरली.



अनूपकुमार  उदासीयांची चाणक्य नीती -भाजपच्या चिन्हावर आपल्या पत्नीला निवडून आणणारे अनूप उदासी यांची पक्षात अंतर्गत मतभेद सुरू होते यातूनच त्यांनी राजकीय सूड घेण्यासाठी उदयसिंग पाडवी यांच्या मर्जीतील   गटनेत्याचा मार्फत  भाजप मधील काहींचा राजकीय काटा काढला ची चर्चा होती, अनूप उदासी हे  पालिकेचा मागील काळात पालिका अधिनियम निवडणूक अधिनियम बद्दल अत्यंत जाणकार म्हणून ओळखले जातात



            काही नगरसेवकांना कोरोनाची लक्षणे असल्याने ते आर.टी.पी.सी.आर चाचणी करणार होते. त्यामुळे पूर्व सावधानता म्हणून विशेष सभेला गैरहजर होते. याशिवाय आमचे गटनेते भास्कर मराठे हे आमच्या सोबत नसल्याने विषय समित्यांवर एकमत होणार नव्हते. या विशेष सभेला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच निर्णय कळविण्यात येईल. 


नगराध्यक्ष

अजय परदेशी

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?