Posts

Image
तळोद्यातून गौरव वाणी यांची उमेदवारी अर्ज दाखल आता वाणी यांना किती मत पडणार याची चर्चा कालीचरण सूर्यवंशी   ✒️ धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीची लढत धुळे नंदुरबार जिल्ह्यातील दिगग्ज नेते अमरीश भाई पटेल समोर  तलोद्याचे नगरसेवक गौरव वाणी अधिकृत उमेदवार असणार असून  एक तरुण  काँग्रेस नगरसेवकास विधान परिषद ची उमेदवारी भेटणे हि निश्चितच अभिमानाची बाब असली तरी भाईंची राजकीय ताकद पाहता हि लढत फक्त  औपचारिक असणार हे आता लपलेले  नसल्याची चर्चा धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे... दरम्यान मागील दोन निवडणुकीचा अनुभव पाहता अमरिशभाई पटेल यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेस चे गौरव वाणी यांना किती मते पडता?     याकडे आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचं लक्ष तसेच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले असून धुळे नंदुरबार जिल्ह्यात पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे व सध्या विधान परिषदेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार अमरिशभाई पटेल यांचे दोघे जिल्ह्यात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मागील पोट निवडणूकीत ज्या पद्धतीने त्यांच्या विजय झाला...
Image
कृषी उत्पन्न बाजार समिती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर   आमदार राजेश पाडवी स्वतः पॅनल उभ करण्याची भूमिका तर काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी  यांच परखड मत निवडणूक कामात  खर्च अधिक येत असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असल्याची उदेसिंग पाडवी यांची भूमिका   १९९९ पासून बिनविरोध निवड मात्र आम्ही यंदा निवडणूक लढविणार असे  विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची स्पष्ट भूमिका तर  माजी मंत्री निवडणूक साठी सज्ज   कालीचरण सूर्यवंशी/तळोदा राज्यातील इतर  तालुका  कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडनुक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून तळोदा  तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात  आला आहे.तळोदा येथील कृषी उत्पन बाजार समीतिचे वैशिष्ट्य म्हणजे १९९९ पासून ते आजतायगत मागील पंचवीस वर्षे पासून बिनविरोध होत आली आहे,  येणाऱ्या निवडणूकित देखील सर्वाना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक साठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान चेयरमन उदयसिंग पाडवी यांनी बाजार समितीच्या माध्यमातून श्री दत्त पे...
Image
बाऊन्सरचा बादशाहा..........हरपला आज सन्मित्र पदमेश माळी यांचा मॅसेज आला. अविनाश भाऊ यांचे दुःखद निधन.  वार्ता ऐकून मन विद्युत वेगाने पार १९९० च्या दशकात घेऊन गेले आणि डोळ्या समोर या खेळाडू योद्धा चा चेहरा फिरू लागला अविनाश भाऊ (बद्री)  म्हटल म्हणजे बळकट गोठीव शरीर मजुबत बांधा चेहऱ्यवर फुल दाढी, दणकट रांगडा गडी एखाद्या योद्धा प्रमाणे  सदैव मैदानावर त्याचा वावर असायचा. सामना सुरू असताना स्वतः च्या संघातील नव्हे तर विरुद्ध संघातील खेळाडू देखील ज्यांचा शब्द टाळत नसत अश्या निवडक जेष्ठ खेळाडू पैकी अविनाश भाऊ आज आपल्याला कायमचा सोडून गेला यांवर विश्वास बसत नाही. हॅन्डबॉल चा राईट इन, कबड्डीचा कव्हर, व्हॉलीबॉल (शॉटी) च्या सेंटर, ९० च्या दशकातील लेदर बॉल च्या वेगवान गोलंदाज विशेषतः  त्यांचा बाऊन्सर बऱ्या बऱ्या फलंदाज ला घायाळ करत असेल अनेकांनी त्या तीक्ष्ण चेंडुची भेदकता अनेकांनी अनुभवली आहे , जय विश्वक्रिडा मंडळ नंतर लेदर बॉल चा खेळ तलोद्यात बंद झाल्या नंतर तलोद्यातील नामवंत क्रिकेट संघ स्वामी विवेकानंद मधून मॉंटेक्स बॉल असो, एम,आर,एफ, असो खन्ना असो ,कास्को असो, संघातील सर्वा...
Image
संध्याकाळी उशिरा फिरणाऱ्या नागरिकांनो सावधान .....................तो हॉर्न वाजवत नाही........    कालीचरण सूर्यवंशी  ✒️          तळोदा शहर हद्दीत बिबटया येऊन ठेपला असून शहादा रस्त्यावर नवीन प्रवेशद्वार ते वन विभागाच कार्यालय या भागात बिबट मुक्त संचार दिसून येत आहे....            दिनांक 3 - 8 - 21 शुक्रवार रोजी सायंकाळी सात पंचेचाळीस वाजेच्या सुमारास राजू गुरव यांच्या सर्व्हिस स्टेशन घराजवळील नाल्यातून बिबट्या रस्ता ओलांडून फॉरेस्ट ऑफिस कार्यालय   नर्सरी कडे गेल्याने रस्त्यावर महिला व पुरुष फिरायला जाणार्‍या नागरिकांची एकच धावपळ उडाली दरम्यान सदर भागात सतत रहदारी असते मागील काळात या भागात पथदिवे बसविले गेले असल्याने संध्याकाळी फिरायला जेष्ठ नागरिक व महिला यांची गर्दी असते काल देखील अशीच गर्दी होती मात्र बिबटयाला पाहताच सर्व सेरभेर झाले   बिबट्या चक्क वन विभागाच्या आवारात मुक्त संचार तळोदा वन क्षेत्रातच नव्हे तर ग्रामीण भागात शेतशिवारात बिबट्या दिसणं नवीन नाही मात्र चक्क तळोदा मेवासी वन विभागाच्या आवारात च...
Image
अनूप उदासी शिवसेनेत दाखल होणार ? 🚩     निझर इथं गुप्त बैठकित निर्णयाची चर्चा कालीचरण सूर्यवंशी ✒️   तलोद्यातील माजी उपनगराध्यक्ष तसेच  भाजपात  राहून देखील सेना स्टाईल ने  सडेतोड राजकीय भाष्य करणारे  आक्रमक नेतृत्व म्हणून परिचित असणारे नेते  माजी उपराध्यक्ष अनूप उदासी  व  गेल्या अनेक वर्षांपासून एकच झेंडा हातात घेऊन शहरात संघटन  टिकविण्यासाठी संघर्ष करणारे दोन नेते   शहर प्रमुख जितेंद्र दुबे  शिवसेना स्थापना पासुन सोबत असणारे जेष्ठ नेते संजय पटेल  , पूर्व श्रमीचे व नुकतेच भाजाप जिल्हाअध्यक्ष पद सोडून शिवसेनेत आलेले आनंद सोनार यांची एक  गुप्त बैठक  गुजरात राज्यात निझर इथं पार पडली असून यावेळी  काय चर्चा झाली हे गुपित असलं तरी  संभाव्य चर्चा अशी असू शकते -  पूर्व श्रमीचे पक्के सैनिक म्हणून वाटचाल करणारे  यांनी मागील निवडणुकीत  एका राष्ट्रीय पक्ष कडून एन वेळी कुटुंबातील सदस्य ला उमेदवारी देत निवडणूक लढवली व जिंकली देखील  मात्र संघटन पदाधिकारी व पालिकेत गटात सतत वैचारिक मतभेदा...
Image
तळोद्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे रिक्त पदा बाबत राजकीय  गोटात आश्चर्य कालीचरण सूर्यवंशी ✒️ राष्ट्रवादी काँग्रेस चे  तालुका शहर सह सर्वच पदे रिक्त असल्याने पदांचे वाटप का केलं जातं नाही याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे,  राज्यात सत्तेत असणाऱ्या  पक्षात  काँग्रेस पक्षला सोड चिट्ठी देत  काँग्रेस मधून   तलोद्यातील माजी आमदार सह काही  काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात असणारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक गेल्याने राष्ट्रवादी आता शहरात येणाऱ्या पालिका निवडणुकीत एक प्रबळ असा अंदाज लावण्यात आला होता, मात्र  अनेक प्रमुख पदे रिक्त असल्याने  आश्चर्य व्यक्त करण्यात   येत असून आता या बद्दल उलट सुलट चर्चाना उत् आले आहे           शहादा तलोद्याचे माजी आमदार उदयसिंग पाडवी  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर पक्ष नेतृत्वाने त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर  तळोदा शहरातील व तालुक्यातील पदें लवकरच जाहीर होतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता , तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर...
Image
भाजप नवीन फळी उभी करणार? कालीचरण सूर्यवंशी✒️                  तळोदा भाजप मधील अंतर्गत कलह सत्तास्थापने पासून सुरू असून दरम्यान मागील काळात तळोदा पालिकेचा सत्ताधारी भाजप गटा मधील अंतर्गत कलह तसेच  माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत बगीचा लोकार्पण कार्यक्रमात एक दोन वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे पक्ष पातळीवर याची दखल जिल्हा नेतृत्वाने घेतली असुन या बाबतीत नगराध्यक्ष व नगरसेवकांना जाब विचारण्यात आले होते. त्यामुळे तळोदा शहरात भाजप मधील प्रस्थापित राजकीय व्यक्तींना नवीन पर्याय येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजप शोधत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून या बाबतीत कोणतं बड वलय असलेल नेतृत्व  माजी नगराध्यक्ष भरत माळी भाजपा मध्ये कसे येतील या करिता जोरदार प्रयत्न पक्ष पातळीवर सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त  आहे, एकंदरीत येणाऱ्या काळात आता घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत , दरम्यान काँग्रेस च्या एका जेष्ठ पदाधिकारी च्या म्हणण्यानुसार  आमचे नेते भरत माळी यांना भाजप  कडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे त हे सत्य आहे ...