अनूप उदासी शिवसेनेत दाखल होणार ? 🚩
निझर इथं गुप्त बैठकित निर्णयाची चर्चा
कालीचरण सूर्यवंशी✒️
तलोद्यातील माजी उपनगराध्यक्ष तसेच भाजपात राहून देखील सेना स्टाईल ने सडेतोड राजकीय भाष्य करणारे आक्रमक नेतृत्व म्हणून परिचित असणारे नेते माजी उपराध्यक्ष अनूप उदासी व गेल्या अनेक वर्षांपासून एकच झेंडा हातात घेऊन शहरात संघटन टिकविण्यासाठी संघर्ष करणारे दोन नेते शहर प्रमुख जितेंद्र दुबे शिवसेना स्थापना पासुन सोबत असणारे जेष्ठ नेते संजय पटेल , पूर्व श्रमीचे व नुकतेच भाजाप जिल्हाअध्यक्ष पद सोडून
शिवसेनेत आलेले आनंद सोनार यांची एक गुप्त बैठक गुजरात राज्यात निझर इथं पार पडली असून यावेळी काय चर्चा झाली हे गुपित असलं तरी
संभाव्य चर्चा अशी असू शकते -
पूर्व श्रमीचे पक्के सैनिक
म्हणून वाटचाल करणारे यांनी मागील निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्ष कडून एन वेळी कुटुंबातील सदस्य ला उमेदवारी देत निवडणूक लढवली व जिंकली देखील
मात्र संघटन पदाधिकारी व पालिकेत गटात सतत वैचारिक मतभेदांमुळे काहीसे नाराज दिसत होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील आमंत्रण देण्यात आल्याच बोललं जातं मात्र प्रभागाची स्थिती पाहता नेमकं कुठं जायच असा प्रश्न पडला असतांना पुन्हा जूनेभिडू नवीन खेळी करण्याचा विचार असू शकतो तसेच
कोणत्या प्रभागात उमेदवारी करायची सोबत कोण असेल ?
संभाव्य वार्ड रचना कशी असेल ?
याच सोबत प्रवेश कधी करायचा ? कोण कोण सोबत घेऊन प्रवेश करायचा यावर चर्चा झाल्याच समजते त्या मूळ अजूनही काही नेते मंडळी सेनेत दाखल होण्याची शकत्या वर्तवली जात आहे
तळोदा नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक अजून खूप अवकाश असला तरी काही मुरब्बी राजकीय व विद्यमान नगरसेवक पद आज घरातील सदस्य कडे असले तरी पुढील वाटचाल सुकर करण्यासाठी ठाम पणे निर्णय घेऊन आता पासून भविष्यात कोणत्या पक्ष कडून उमेदवारी करायची या साठी सर्वच बाजू चाचपडून पाहत आहेत,सर्वांचा जवळ जुळवून येत्या पालिका निवडणूकित राजकीय खेळी करण्यासाठी सज्ज होत आहेत,
Comments
Post a Comment