कृषी उत्पन्न बाजार समिती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर
आमदार राजेश पाडवी स्वतः पॅनल उभ करण्याची भूमिका तर काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी यांच परखड मत
निवडणूक कामात खर्च अधिक येत असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असल्याची उदेसिंग पाडवी यांची भूमिका
१९९९ पासून बिनविरोध निवड मात्र आम्ही यंदा निवडणूक लढविणार असे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची स्पष्ट भूमिका तर माजी मंत्री निवडणूक साठी सज्ज
राज्यातील इतर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडनुक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.तळोदा येथील कृषी उत्पन बाजार समीतिचे वैशिष्ट्य म्हणजे १९९९ पासून ते आजतायगत मागील पंचवीस वर्षे पासून बिनविरोध होत आली आहे,
येणाऱ्या निवडणूकित देखील सर्वाना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक साठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान चेयरमन उदयसिंग पाडवी यांनी बाजार समितीच्या माध्यमातून श्री दत्त पेट्रोल पंप च्या भूमीपूजन प्रसंगी मनोदय व्यक्त केला असला तरी आमदार राजेश पाडवी यांची भूमिका महत्वाची असणार आहे,गुजरात पश्चिम महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधून व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने येत असून दर शुक्रवारी वर्षभर बाजार भरत असतो वार्षिक सर्व साधारण उत्पन्न ५२ लाख इतके आहे,
तालुक्यातील ६८ ग्राम पंचायत मधून त्यातील सुमारे ५५ ग्रामपंचायत मध्ये प्रशासक नेमले आहेत, त्यातून चार जणांची निवड करण्यात येईल तर शेतकरी सोसायटी मतदार संघात ११ सदस्य व व्यापारी संघामधून दोन सदस्य निवडले जातील तर हमाल मापाडी मधून एक सदस्य असे एकूण १८ सदस्य निवडले जातील,
महाविकास आघाडीचे अशासकीय सदस्य सध्या कार्यरत -
मागील काळात निवडणुका चे वारे वाहत असल्याने साधारण सहा महिन्यापूर्वीच महाविकास आघाडी पॅटर्न राबवत अशासकीय सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे ९
तर राष्ट्रीय काँग्रेसचे ५
व शिवसेना ३
भारतीय कम्युनिस्ट पक्ष १
असे सदस्य निवडण्यात आलेले आहेत
भाजपच्या भूमिके कडे लक्ष -
दरम्यान महाविकास आघाडी पटर्न तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सुरू असून भाजपा कडून आता या बाबतींत काय भूमिका घेते या कडे लक्ष लागून आहे,तळोदा पँचायत समितीत काँग्रेस व भाजप यांनी संयुक्तपणे अडीच अडीच वर्षाचा सत्ता वाटून घेतली असल्याने तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या भूमिकेला महत्व असणार आहे,या बाबतीत तळोदा एक्सप्रेस यांनी आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भाजपा स्वतः चे पेनल या निवडणुकीत उभे करणार असून सोबत काही समविचारी उमेदवार देखील घेणार असून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप पुर्ण ताकदीने लढेल
आमदार राजेश पाडवी
तर या बाबतीत विद्यमान सभापती उदयसिंग पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तळोदा एक्सप्रेस शी बोलतांना सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कामी स्वतः बाजार समितीला लाखो रुपयांचा खर्च येत असतो.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी याना भत्ता व कागदपत्र छपाई साठी येणारा मोठा खर्च वाचविण्यासाठी सर्व पक्षांचा लोकांना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक करण्यासाठी
मी प्रयत्नशील आहे
उदेसिंग पाडवी
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती
दरम्यान उदेसिंग पाडवी हे भाजपचे माजी आमदार तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत तर सध्या सभापती पदावर आहेत.त्या मुळे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी निवडणूक लढविणार असनार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने येणाऱ्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील राजकारण ढवळून निघण्याची संकेत प्राप्त होत आहेत
दरम्यान,या बाबतीत तळोदा एक्सप्रेस जवळ माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,आम्ही यंदा बिनविरोध निवडणूक होऊ देणार नाही तळोदा तालुक्यातील कृषी उत्पन बाजार समितीची निवडणुल झाल्यास काँग्रेस ला निश्चितपणे यश मिळू शकते म्हणून काँग्रेस स्वतः पेनल उभं करून लढणार आहोत.
ता,क✒️
कोणीही कॉपी पेस्ट करू नये अन्यथा अवमान होईल
Comments
Post a Comment