बाऊन्सरचा बादशाहा..........हरपला
आज सन्मित्र पदमेश माळी यांचा मॅसेज आला. अविनाश भाऊ यांचे दुःखद निधन. वार्ता ऐकून मन विद्युत वेगाने पार १९९० च्या दशकात घेऊन गेले आणि डोळ्या समोर या खेळाडू योद्धा चा चेहरा फिरू लागला अविनाश भाऊ (बद्री) म्हटल म्हणजे बळकट गोठीव शरीर मजुबत बांधा चेहऱ्यवर फुल दाढी, दणकट रांगडा गडी एखाद्या योद्धा प्रमाणे सदैव मैदानावर त्याचा वावर असायचा. सामना सुरू असताना स्वतः च्या संघातील नव्हे तर विरुद्ध संघातील खेळाडू देखील ज्यांचा शब्द टाळत नसत अश्या निवडक जेष्ठ खेळाडू पैकी अविनाश भाऊ आज आपल्याला कायमचा सोडून गेला यांवर विश्वास बसत नाही.
हॅन्डबॉल चा राईट इन, कबड्डीचा कव्हर, व्हॉलीबॉल (शॉटी) च्या सेंटर, ९० च्या दशकातील लेदर बॉल च्या वेगवान गोलंदाज विशेषतः त्यांचा बाऊन्सर बऱ्या बऱ्या फलंदाज ला घायाळ करत असेल अनेकांनी त्या तीक्ष्ण चेंडुची भेदकता अनेकांनी अनुभवली आहे
, जय विश्वक्रिडा मंडळ नंतर लेदर बॉल चा खेळ तलोद्यात बंद झाल्या नंतर तलोद्यातील नामवंत क्रिकेट संघ स्वामी विवेकानंद मधून मॉंटेक्स बॉल असो, एम,आर,एफ, असो खन्ना असो ,कास्को असो, संघातील सर्वात जेष्ठ खेळाडू असून देखील प्रत्येक चेंडूवर आपल्या अष्टपैलू खेळाने संघा साठी महत्वाची भूमिका बजावणारा खेळाडू म्हणून तळोदा शहर व तालुक्यातील सर्वच क्रिकेट संघातील खेळाडू साठी मोठा भाऊ म्हणून सर्वाना अविनाश भाऊंचा नितांत आदर होता खेळाडू वृत्ती सतत खेळत असतांना त्यांच्यात दिसून येत असे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट म्हणजे त्याचा जीव की प्राण..क्रिकेटमधील प्रसिद्घ गाेलंदाची ती सुद्धा काटकसरीने करणे त्याचे वैशिष्टय हाेते.. दिवसा मैदानावर आपल्या विवेकानंदन टीम साेबत तर रात्री दिग्विजयच्या मित्रांबराेबर ... दाेघही संघासाेबत समताेल साधून मैत्री जाेपासत असे...
अश्या जेष्ठ खेळाडूला
माझा अखेरचा मानाचा मुजरा🙏
कालीचरण सूर्यवंशी ✒️
Comments
Post a Comment