संध्याकाळी उशिरा फिरणाऱ्या नागरिकांनो सावधान
.....................तो हॉर्न वाजवत नाही........

  कालीचरण सूर्यवंशी ✒️
         तळोदा शहर हद्दीत बिबटया येऊन ठेपला असून शहादा रस्त्यावर नवीन प्रवेशद्वार ते वन विभागाच कार्यालय या भागात बिबट मुक्त संचार दिसून येत आहे....


           दिनांक 3 - 8 - 21 शुक्रवार रोजी सायंकाळी सात पंचेचाळीस वाजेच्या सुमारास राजू गुरव यांच्या सर्व्हिस स्टेशन घराजवळील नाल्यातून बिबट्या रस्ता ओलांडून फॉरेस्ट ऑफिस कार्यालय   नर्सरी कडे गेल्याने रस्त्यावर महिला व पुरुष फिरायला जाणार्‍या नागरिकांची एकच धावपळ उडाली दरम्यान सदर भागात सतत रहदारी असते मागील काळात या भागात पथदिवे बसविले गेले असल्याने संध्याकाळी फिरायला जेष्ठ नागरिक व महिला यांची गर्दी असते
काल देखील अशीच गर्दी होती मात्र बिबटयाला पाहताच सर्व सेरभेर झाले


 बिबट्या चक्क वन विभागाच्या आवारात मुक्त संचार

तळोदा वन क्षेत्रातच नव्हे तर ग्रामीण भागात शेतशिवारात बिबट्या दिसणं नवीन नाही मात्र चक्क तळोदा मेवासी वन विभागाच्या आवारात चक्क बिबट्या हिंडत असल्याने बिबटयाने वन विभागा ला आवारात येत आव्हान दिल् आहे,

तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकदा बिबटया चा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे होत असते  मात्र आता  वन 
 वन विभागाच्या मानधन कर्मचारी इंद्रसिंग राजपूत यांस बिबट्या वन विभागाच्या परिसरात  दिसल्याने आता वन विभाग काय उपाय योजना करतो या कडे लक्ष लागून आहे 



तळोदा वन विभागाच्या मालकीचे हॉटेल प्रियांका समोरील बहुरूपा रस्ता पासून ते आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पावेतो  जागा असून या ठिकाणी उप वनसंरक्षक  विभागाचे कार्यालय आहे तसेच मेवासी वन विभाग रोपवाटिका  तसेच कर्मचारी निवासस्थाने आहेत,  एकूण हि जागा 12 हॅकटर इतकी आहे या परिसरात  काटेरी झुडूप वाढले आहेत, तसेच काही प्रमाणात बाभूळ जंगल आहे

 क्षेत्रात बिबट ची संख्या मागील पंधरा ते वीस वर्षांत लक्षणीय वाढली असून  शेत शिवारातील रस्त्यात  सायंकाळी व पहाटे बिबट दिसणं आता  नेहमीचंच झालं आहे


तळोदा तालुक्यात बिबटय़ाची दहशत


 तळोदा तालुक्यातील चिनोदा , धनपुर, रांझणी,  मोड ,कळमसरे, चिनोदा रोझवा पुनर्वसन,  तसेच होतोडा रस्ता, तसेच कुटीर रुग्णालय ला लागून असलेल्या गुजरात हद्दीतील उंटावद  शिवार  तसेच बोरद प्रतापूर गावांच्या शेतशिवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ा व वाघांचा वावर आढळून येत आहे. गेल्या महिन्याभरात अनेक पशूपालकांच्या शेळ्या ,मेंढय़ा,तसेच चिनोदा शिवारात गायीचे वासरू फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील वाघ,बिबटय़ा यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावराने पशूपालकांसह शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने
 शेती शिवारात बिबटय़ा दिसल्याने शेतकरी व शेतमजूरामध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

तळोदा वनक्षेत्रात बिबट ची संख्या वाढली
       वन विभाग शेतकरी यांना दरवर्षी होणाऱ्या या घटना पाहता गोणपाट ,मिरची पावडर,जून वापरलेलं ऑईल असं साहित्य घेऊन त्यास विशिष्ठ पद्धतीने तयार करून ते पेटविल्यास त्याचा उग्र वासाने बिबट येत नाहीत ,त्याच बरोबर फटाके अथवा तत्सम आवाज केल्यास धोका कसा टळू शकतो या बाबत मार्गदर्शन बिबट प्रवण क्षेत्रात शेतकरी व मजूर यांना होणे आवश्यक असल्याचं मत वन्यप्रेमी मधून व्यक्त होत आहे.एकूणच तळोदा शहर नजीक चारही  दिशेला बिबट चा वावर वाढतच आहे तसेच तालुक्यात देखील हिच परिस्थिती असल्यामुळं तळोदा तालुका वनक्षेत्रात बिबट संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे बोलले जाते.या बाबत प्रत्यक्षदर्शी राजेंद्र गुरव यांनी दैनिक दिव्य मराठी जवळ बोलताना सांगितले की 
वन विभागाचा बाजूने असलेल्या नाल्याच्य भागात मागील काळात बिबट संध्याकाळी नेहमीच मुक्त संचार करतांना दिसत असून मागील काही दिवसांपासून त्या सोबत  दोन बछडे देखील दिसत आहेत या बाबतीत वन विभागा कडून बंदोबस्त करण्यात यावा.या भागात पहाटे व संध्याकाळी फिरणारे व रात्री कुटुंबसह शत पावली करणारे  जेष्ठ नागरिक व महिला येत असतात त्या मुळे अधिक प्रकाश  देणारे पथदिवे बसविणे आवश्यक आहे,
          



       सदर बिबट बद्दल वन विभागाकडे संपर्क साधला असता बिबट वन्यजीव हा वनक्षेत्रात ,शेतात, भक्ष्यच्या शोधात असतो त्या मूळ कधीतरी मानवी वस्ती कडे भक्ष्य चा मागे येत असतो त्याच एक निश्चित स्थान नसते कित्येक किलोमीटर त्याचा संचार एका दिवसात होत असतो तरीही नागरिकांनी संध्याकाळी फिरताना काळजी घ्यावी
                             टी, के, बागुल  उप वनसरंक्षक 




 

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?