तळोद्यातून गौरव वाणी यांची उमेदवारी अर्ज दाखल

आता वाणी यांना किती मत पडणार याची चर्चा

कालीचरण सूर्यवंशी  ✒️

धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीची लढत धुळे नंदुरबार जिल्ह्यातील दिगग्ज नेते अमरीश भाई पटेल समोर  तलोद्याचे नगरसेवक गौरव वाणी अधिकृत उमेदवार असणार असून  एक तरुण 
काँग्रेस नगरसेवकास विधान परिषद ची उमेदवारी भेटणे हि निश्चितच अभिमानाची बाब असली तरी भाईंची राजकीय ताकद पाहता हि लढत फक्त  औपचारिक असणार हे आता लपलेले  नसल्याची चर्चा धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे...
दरम्यान मागील दोन निवडणुकीचा अनुभव पाहता अमरिशभाई पटेल यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेस चे गौरव वाणी यांना किती मते पडता?
    याकडे आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचं लक्ष तसेच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले असून धुळे नंदुरबार जिल्ह्यात पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे व सध्या विधान परिषदेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार अमरिशभाई पटेल यांचे दोघे जिल्ह्यात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मागील पोट निवडणूकीत ज्या पद्धतीने त्यांच्या विजय झाला त्या वरून महाविकास  आघाडीत  बिघाडी  असल्याचे बोलले जाते 
           मागील वर्षी झालेल्या पोट निवडणुकीत महा विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार शहादयाचे अभिजीत पाटील यांना 98 मत मिळाले होते वास्तविक काँग्रेस व म,वी,आ ची संख्या पाहता  आघाडी धर्म अनेकांनी पाळला नव्हता हे  निकाल अंती स्पष्ट झाले,
 दरम्यान  मतदारांची संख्या पाहता व मिळालेले मतदान पाहता या वेळेस काही वेगळे होणे अपेक्षित नाही , त्याला कारणही तसेच आहे, मागील काळात अनेक दिगग्ज नेत्यांना अमरीश भाई यांना मदत केली आहे.तसेच अनेक नेत्यांवर त्यांचे  राजकीय उपकार आहे



  धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या पाहता प्रत्यक्ष असलेले मतदान व मिळालेले मतदान यावरून महाविकासआघाडी मधीलच काही लोकप्रतिनिधी यांनी अमरिश भाईंच्या बाजूने कौल देत धुळे नंदुरबार जिल्हात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे स्पष्ठ संकेत पोटनिवडणुकीत देऊन टाकले होते.
           एकूणच गौरव वाणी  यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली असून तलोद्यातूनच उमेदवारी का दिली गेली ? या बद्दल विविध चर्चा व  मिम्स सोशल मीडियावर येत असून या बाबत कोणी  प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत तर कोणी या बाबतीत राजकीय संकेत देत आहेत.या उमेदवारी  चे दूरोगामी  परिणाम तळोदा शहरातील राजकारणात उमटणार असल्याच बोलले जाते.

धुळे-नंदुरबार पक्षीय बलाबल 


भाजप..........१९९ 
काँग्रेस..........१३६ 
राष्ट्रवादी.........०२०
 शिवसेना........०२० 
एमआयएम......००९
समाजवादी.......००४ 
बसप.............००१ 
मनसे.............००१ 
अपक्ष.............००९ 
एकूण.............३९९

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?