तळोद्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे रिक्त पदा बाबत राजकीय  गोटात आश्चर्य




कालीचरण सूर्यवंशी✒️


राष्ट्रवादी काँग्रेस चे  तालुका शहर सह सर्वच पदे रिक्त असल्याने पदांचे वाटप का केलं जातं नाही याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे,  राज्यात सत्तेत असणाऱ्या  पक्षात  काँग्रेस पक्षला सोड चिट्ठी देत  काँग्रेस मधून   तलोद्यातील माजी आमदार सह काही  काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात असणारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक गेल्याने राष्ट्रवादी आता शहरात येणाऱ्या पालिका निवडणुकीत एक प्रबळ असा अंदाज लावण्यात आला होता, मात्र  अनेक प्रमुख पदे रिक्त असल्याने  आश्चर्य व्यक्त करण्यात   येत असून आता या बद्दल उलट सुलट चर्चाना उत् आले आहे


          शहादा तलोद्याचे माजी आमदार उदयसिंग पाडवी  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर पक्ष नेतृत्वाने त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर तळोदा शहरातील व तालुक्यातील पदें लवकरच जाहीर होतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता ,तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांनी साधारण अडीच महिन्यांपूर्वी राजीनामा देखील दिला असून शहर अध्यक्ष पद अजूनही का रिक्त आहे ? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे,
शहर प्रमुखच नाही तर  सह सर्वच  सेल चें। पदे रिक्तच आहेत,यात युवक शहर आणि ग्रामीण ओबीसी शहर आणि ग्रामीणअल्पसंख्या शहर आणि ग्रामीण असे विविध पद रिक्त आहेत ,
 जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस ची सध्याची स्थिति पाहता  तळोदा शहरात व  तालुक्यात  तसेच जिल्हात माजी आमदार उदयसिंग पाडवी याना प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक झाल्या नंतर  यांचा माध्यमातून संघटन पुर्णबांधणी राष्ट्रवादी करणार असल्याची चर्चा होती,
 

तळोदा पालिका निवडणुकीला अजून साधारण १४ महिने शिल्लक असतांना सर्वच राजकीय पक्ष पातळीवर उत्साह दिसून येत असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कडून नेमणुका रखडल्या असल्याने  संदीप परदेशी सह काही राजकीय वलय असणाऱ्या व्यक्तींनी राष्ट्रवादी काँग्रेस  मध्ये प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वाटचाली कडे लक्ष लागून होते, येणाऱ्या तळोदा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी ची भूमिका काय  असणार ?  अशी चर्चा सुरू असताना संघटनेचे पद रिक्त  असल्याने संघटन बांधणी होणार कधी ?   या बद्दल राष्ट्रवादी गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे बोलले जाते,

भाजप, शिवसेना ,राष्ट्रीय काँग्रेस गोटात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साह च वातावरण आहे तर राष्ट्रवादीत शहरात शांतता दिसून येत आहे,



   राष्ट्रवादी कडून नुकतेच 
साहित्य वाटप  कार्यक्रम दरम्यान उत्साह दिसून आला असला तरी पदे रिक्त का ?  याचीच चर्चा असून राष्ट्रवादीत अजून इन्कमिंग असल्याने हे पदे रिक्त ठेवली आहे की काय ? असे देखील अंदाज वर्तविण्यात येत असले तरी संघटन बांधणीसाठी  नेमणुका आवश्यक असल्याचे असतांना रिक्त का ?
 हा शोधाचा विषय आहे

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?