
बाऊन्सरचा बादशाहा..........हरपला आज सन्मित्र पदमेश माळी यांचा मॅसेज आला. अविनाश भाऊ यांचे दुःखद निधन. वार्ता ऐकून मन विद्युत वेगाने पार १९९० च्या दशकात घेऊन गेले आणि डोळ्या समोर या खेळाडू योद्धा चा चेहरा फिरू लागला अविनाश भाऊ (बद्री) म्हटल म्हणजे बळकट गोठीव शरीर मजुबत बांधा चेहऱ्यवर फुल दाढी, दणकट रांगडा गडी एखाद्या योद्धा प्रमाणे सदैव मैदानावर त्याचा वावर असायचा. सामना सुरू असताना स्वतः च्या संघातील नव्हे तर विरुद्ध संघातील खेळाडू देखील ज्यांचा शब्द टाळत नसत अश्या निवडक जेष्ठ खेळाडू पैकी अविनाश भाऊ आज आपल्याला कायमचा सोडून गेला यांवर विश्वास बसत नाही. हॅन्डबॉल चा राईट इन, कबड्डीचा कव्हर, व्हॉलीबॉल (शॉटी) च्या सेंटर, ९० च्या दशकातील लेदर बॉल च्या वेगवान गोलंदाज विशेषतः त्यांचा बाऊन्सर बऱ्या बऱ्या फलंदाज ला घायाळ करत असेल अनेकांनी त्या तीक्ष्ण चेंडुची भेदकता अनेकांनी अनुभवली आहे , जय विश्वक्रिडा मंडळ नंतर लेदर बॉल चा खेळ तलोद्यात बंद झाल्या नंतर तलोद्यातील नामवंत क्रिकेट संघ स्वामी विवेकानंद मधून मॉंटेक्स बॉल असो, एम,आर,एफ, असो खन्ना असो ,कास्को असो, संघातील सर्वा...