Posts

स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या तळोदा भेटीला ८१ वर्ष पूर्ण

Image
सावरकर ांच्या तळोदा  भेट ीला  ८१ वर्ष पुर्ण गुजरात आणि मध्य प्रदेश चा सीमेलगत असणाऱ्या तळोदा परिसर जरी भोंगलीक दृष्टीकोनातून महाराष्ट्र  चा उत्तर भागातील गाव असलं तरी शिवाजी महाराज व अहिल्याबाई होळकर यांचा पासून ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे इंग्रजांचा जोखडातून देशाला स्वतंत्र करण्यासाठी एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक  स्वातंत्र्यवीर  सावरकर ांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर  सावरकर  यांनी संपुर्ण भारतात  भेट ी देवून निधी गोळा करीत स्वातंत्रयसमर अधिक चेतविला. त्याच अभियानाअंतर्गत दि.१३ मार्च १९४० रोजी त्यांनी तळोदा शहराला  भेट  दिली. आज १३ मार्च २०२१ रोजी त्या  भेट ीला ८१ वर्ष पुर्ण होत आहेत. तळोदा तालुक्यासह ...
Image
  तळोदा आठवडे बाजारात तोबा गर्दी   मुख्यधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत संभ्रम  कार्यवाही अतिक्रमण विरुद्ध ?  विनामास्क ? की आठवडा बाजार निमित्ताने ?  व्यवसायिकामध्ये संभ्रम   तळोदा : तळोदा  पालिकेचा मुख्याधिकारी सपना यांनी शुक्रवारी शहरात प्रमुख बाजार पेठेत फिरून फिजिकल डीस्टन्सिंग करणारे व  विना मास्क असणाऱ्या  दुकानदारांवर कारवाई करून दंड आकाराला.मात्र यावेळी अतिक्रमणाबाबत त्यांनी दुकानदारांना तोंडी सूचना दिल्या असता त्यांना महिला भाजी विक्रेत्यांचा रोषाला सामोरे जावे लागले.हे करत असताना त्यांनी भाजीपाला विक्रेत्या महिला दुकानादारांना अतिक्रमण हटविण्याबाबत देखिल तोंडी सूचना दिल्या.हे करत असतांना त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांचे भाजीपाल्याचे टोपले खाली पालिका कर्मचाऱ्यांकडून उतरवले.या सर्व प्रकारामुळे मुख्याधिकाच्याकडून नेमकी कार्यवाही कसली करण्यात आली. सोशल डिस्टन्स,? आठवडा बाजार बंद ? का अतिक्रमण ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.             तळोदा शहरात आठवडे बाजार दर शुक्रवारी ...

व्यापारी संकुलावर कोणाचा डोळा ?

Image
गाळे लिलावावर कोणाचा डोळा ?"  प्रतिनिधी तळोदा तळोदा पालिकेचा माध्यमातून  बांधण्यात आलेल्या बहुचर्चित व्यापारी संकुलाच्या  लिलाव प्रक्रिया पार पडत असून एकूण १२७  गाळे लिलावात राहणार  असतील  या मूळ तळोदा शहरातील अनेक किरकोळ व्यवसायिकांना हक्काचे दुकान उपलब्द होऊन सोय होणार आहे , या मूळ पालिकेचा उत्पन्नात भर पडणार आहे,  असे असले तरी या गाळ्यांचा  लिलाव करत असताना  रस्त्याच्या लागून पुढे असणारे काही गाळे लिलावात नसल्याचे सूत्र कडून माहिती मिळाली आहे ,   दरम्यान हे गाळे लिलावात का  नाहीत ?  या बद्दल आता उलट  सुलट चर्चा होत असून पालिका बांधकाम विभागाच्या म्हणयानुसार न्यायालया बद्दल आता कोणतेही अडचण नाही ,     मात्र  रस्त्यालगत असणाऱ्या  खालच्या मजल्यावर मोक्याच्या जागेचा लिलाव यात नाही या बाबतीत अधिक माहिती घेतली असता एक लाखाचा वर असणाऱ्या गाळ्यांचा असा ऑन लाईन लिलाव होऊ शकतो असे प्रशासन कडून सांगण्यात आले         सदर व्यापारी गाळे ज्या बांधकाम ठेकेदारास काम देण्यात आले होते त्याच बिल अजून...

सातपुड्यातील आव्हान पार करणारी ताई

Image
शासकीय यंत्रणेतील  महिला कर्मचारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावताना विशेष प्रयत्न करून चांगली कामगिरी करतात. आपल्या प्रयत्नातून काही चांगले घडावे असा त्यांचा प्रयत्न असतो. जिल्ह्याच्या कोणत्या तरी भागात त्यांचे काम शांततेत सुरू असते. अशा महिलांची कामगिरी ‘आम्ही साऱ्याजणी’ या शिर्षकाखाली प्रातिनिधीक स्वरुपात देत आहे.  महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चपर्यंत विशेष वृत्त स्वरुपात ही माहिती देण्यात येईल. दुर्गम भागातील आव्हानांना सक्षमपणे सामोऱ्या जाणाऱ्या हिराबाई - अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या उंचवाडीचा डोंगराळ परिसर.... डोंगरामधून वाहणारी अरुंद पात्र असलेली नदी.... डोंगराच्या वरच्या भागाकडे गेल्यावर स्वच्छ, सारवलेले आणि बांबूच्या तट्ट्यांनी वेढलेले घर...हीच गावातील अंगणवाडी....नवख्या माणसाला चढताना दम लागतो. पण अंगणवाडी सेविका हिराबाई पाडवी यांच्यासाठी हे सोपे आहे. इथल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे. शहरातील माणूस जेव्हा या भागातील पावसाळी परिस्थितीची कल्पना करतो तेव्हाच त्याला हिराबाईंच्या कामाचे महत्व आणि त्यातील आ...

अनेकांचा अरुणोदय करणारे आदरणीय भाऊ,,,

Image
आजात शत्रू  भाऊ मृदुस्वाभाव, मितभाषी ,अजातशत्रू ,आबालवृद्धांना हवेहवेसे ,सर्वस्पर्शी ,सामाजिक बांधिलकी असणारे ,निसर्गमित्र,प्राण्यांवर भूतदया असणारे,हौशी व मित्रांमध्ये रमणारे भाऊ अशी ज्यांची ओळख असे आमचे आधारस्तंभ, पाठीवर कौतुकाची थाप मारून लढ म्हणणारे व जिंकण्यासाठी सतत बळ वाढवून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री अरुण कुमार गोरखनाथ महाजन  तारुण्यात अपार कष्ट व लोकसंपर्क वाढवून ,आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून आम्हाला मार्गदर्शन करताना भाऊ आम्हाला एक दीपस्तंभ भासतात व दिशाहीन व निराश जहालेल्या ना यशाचा मार्ग दाखवतात हेच त्यांचे मोठेपण *आदरणीय आमचे भाऊ*           अध्यापक  शिक्षक मंडळ धुळे - नंदुरबार  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  शिक्षण महर्षी प्राचार्य भाई  साहेब गो,हू,महाजन यांच्या कुटुंबातील जेष्ठ सदस्य म्हणून त्यांची ओळख असली तरी   भाई साहेबांच अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यमान अध्यक्षा सौ, मंगलाताई महाजन यांच्या पाठीमागे नव्हे तर सोबत उभं राहून या वटवृक्षाचा  विस्तार अधिक मोठा करण्यात भाऊ...

पानांचा सोबत दुसऱ्यांच्या जीवनात रंग भरणारा मित्रांचा सदैव स्मृतीराहणारा स्व, राजेश उर्फ बंडू पाटील ,,,आज सहावा स्मृतिदिन

Image
एक आठवण बंडू ची !      तळोदे शहरातील मुख्य बाजारपेठे तील स्मारक चौकात असणारी   पानदुकान,  " राजेश पान सेंटर " आजही , अनेक तळोदेकरांचा मनात घर करून आहे...ते फक्त बंडूमुळेच..         शाळकरी वयातच बंडू ने पानटपरी  चालवणे सुरू केले .आणि थोड्या च कालावधीत , आपली मेहनत, जिद्द, चिकाटीने टपरी चा विस्तार केला.....         हातमजूर ते ठेकेदार, काँट्रॅक्टर, राजकीय,  सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांची ती एक हक्काची पान टपरी होती .   अनेकांना रात्री बंडूच्या  हातून पान, घुटका खाल्ल्या शिवाय झोप लागत नसे.    बंडू च्या टपरी वरील कलकत्ता मिठा पान खाने म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होत...         बंडू ची स्मरणशक्ती जबर होती ..गिर्हाइकाची पंसद माहित असे, नुसती  सावली बघून  मनासारखे पान, घुटका समोर मांडत असे .       नंदुरबार ते सुरत पट्ट्यातील अनेक पान गादी वाले बंडू चे मित्र होते त्यांच्या कडून टपरीवर लागणाररी उच्च दर्जाची  पाने मागवित असत.     ...

शिवजयंती निमित्त तलोद्यात विविध उपक्रम

Image
प्रतिनिधी तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो,हु. महाजन व शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात तळाेदे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त निमित्ताने...      शिवाचरित्रांचा प्रेरणादायी उपक्रम...काेवीड १९ च्या पार्श्वभूमीवर  राबविण्यात आला  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी हाेता आले नाही ...परंतु work from home व online च्या माध्यमातून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला..यांत पोवाडे, शिवगर्जना-घोषणा,कविता,नृत्य नाटिका सादर केल्यात.या बरोबरच विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या शिव चित्रांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले..  या  प्रदर्शनाला शाळेचे सन्माननीय प्राचार्य ए.एच. टवाळे , उपमुख्याध्यापक  एस,एम.महिरे, पर्यवेक्षक आर सी माळी, पर्यवेक्षक एन.जी. माळी तसेच   सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा, अमरदिप महाजन , जेष्ठ शिक्षक प्रा. बी,जी, माळी  उल्हास केदार आदींनी  गड किल्लयांची प्रतिकृती व चित्रांची पाहणी  करण्यासाठी प्रदर्शन स्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांना दाद दिली...🚩🙏 ...