तळोदा आठवडे बाजारात तोबा गर्दी
मुख्यधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत संभ्रम
कार्यवाही अतिक्रमण विरुद्ध ? विनामास्क ? की आठवडा बाजार निमित्ताने ? व्यवसायिकामध्ये संभ्रम
तळोदा : तळोदा पालिकेचा मुख्याधिकारी सपना यांनी शुक्रवारी शहरात प्रमुख बाजार पेठेत फिरून फिजिकल डीस्टन्सिंग करणारे व विना मास्क असणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून दंड आकाराला.मात्र यावेळी अतिक्रमणाबाबत त्यांनी दुकानदारांना तोंडी सूचना दिल्या असता त्यांना महिला भाजी विक्रेत्यांचा रोषाला सामोरे जावे लागले.हे करत असताना त्यांनी भाजीपाला विक्रेत्या महिला दुकानादारांना अतिक्रमण हटविण्याबाबत देखिल तोंडी सूचना दिल्या.हे करत असतांना त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांचे भाजीपाल्याचे टोपले खाली पालिका कर्मचाऱ्यांकडून उतरवले.या सर्व प्रकारामुळे मुख्याधिकाच्याकडून नेमकी कार्यवाही कसली करण्यात आली. सोशल डिस्टन्स,? आठवडा बाजार बंद ? का अतिक्रमण ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.
तळोदा शहरात आठवडे बाजार दर शुक्रवारी भरत असतो. शहरात व तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आठवडा बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले होते.त्याबाबतची सूचना जाहीर फलकावर लावण्यात आली होती व रिक्षावर देखिल पालिकेकडून तसा संदेश नागरिकांपर्यत पोहचविण्यात आला होता.असे असले तरी ग्रामिण भागांतील नागरीक आठवडे बाजाराचा वार म्हणून शुक्रवार मोठया प्रमाणात तळोदा शहरात दाखल झाल्याने ठिकठिकाणी गर्दी दिसून येत होती.
या पार्श्वभूमीवर तळोदा पालिकेच्या मुख्यधिकारी सपना वसावा यांनी शुक्रवारी स्मारक च़ौक, कपडा बाजार, सोनार बाजार, जुन्या पालिकेचा परिसर या भागात फिरून फिजिकल डीस्टनसिंगचे उल्लंघन करणाऱ्या,विना मास्क असणाऱ्यांवर कार्यवाही केली. त्यांचा सोबत पालिकेचे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माळी स्वछता निरीक्षक अश्विन परदेशी, आदी कर्मचारी कार्यवाही दरम्यान उपस्थित होते.
स्मारक चौकातील ज्या ठिकाणी बाजार भरणार नाही या सूचनेचे जाहीर फलक लावण्यात आले होते.त्याठिकाणी सकाळी नेहमी प्रमाणे बाहेर गावाहून आठवडे बाजारात येणाऱ्या व्यावसायिकांनी फलकाचा आजू-बाजूला रस्त्यावर दुकान थाटली असल्याचे दिसून आले. वास्तविक या बाबतीत पालिकेकडून सकाळीच एकदा कर्मचारी वर्ग कडून कडक सूचना दिल्या पाहिजे होत्या मात्र त्यामुळं मुख्यधिकारी फिरत असताना देखील या भागातच नव्हे तर सर्वत्र बाजार भरलेला दिसून आला.
महिलांच्या रोषाला जावे लागले सामोरे
तळोदा शहरात नेहमीप्रमाणे आठवडे बाजार भरला असताना मुख्याधिकारी सपना वसावा यांनी भन्साली प्लाझाजवळ असणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांना भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी मुख्याधिकारी सपना वसावा यांनी भाजी विक्रेत्यांवर दुकान समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आल्याने त्यांनी फिजिकल डिस्टंसिंग उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला व त्यांच्यावर दंडाची आकारणी केली.हे करत असताना त्यांनी भाजीपाला विक्रेत्या महिला दुकानादारांना अतिक्रमण हटविण्याबाबत देखिल तोंडी सूचना दिल्या.हे करत असतांना त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांचे भाजीपाल्याचे टोपले खाली उतरवायला लावले. यामुळे भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांच्या रोष मुख्यधिकारी यांनी ओढवून घेतला.
त्यामुळे मुख्याधिकारी नेमकी कारवाई कशाबाबत करत आहेत हेच दुकानदारांच्या लक्षात आले नाही. दुकानदारांकडून कारवाई करत असताना आम्हाला अतिक्रमण हटविण्याबाबत पुर्व सूचना द्यायला पाहिजे हवी होती,असे वारंवार सांगण्यात येत होते.आठवडे बाजार भरणार नाही,अशा सूचना असतांना देखिल दुकाने लावली,ती लावता येणार देखिल नाही,असे देखिल कारवाई करत असताना मुख्याधिकारी वसावा यांच्याकडून सांगण्यात येत होते. मात्र ही दुकाने दररोज नियमितपणे सुरू असणारी असून आठवडे बाजार निमित्ताने थाटल्या जाणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याऐवजी नियमित भाजीपाला विक्री करणाऱ्या दुकानांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.या सर्व प्रकारामुळे मुख्याधिकारी नेमके कारवाई कशाबाबत करत आहेत,याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली.या भागात नियमित भाजी विकत्रे दुकान थाटत असतात, जर पालिकेने सोशल डिस्टन्स बद्दल कार्यवाही केली असेल तर मग नुसता दंड आकारू शकतात मात्र पालिका प्रशासन कडून भाजीच्या टोपल्या रस्त्यावर ठेवण्यात आल्याने नेमकी कार्यवाही कसली सोशल डिस्टन्स,? आठवडा बाजार बंद ? का अतिक्रमण ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.
आठवडे बाजार भरवण्यात येणार नाही अशी सूचना ध्वनिक्षेपकावर गाडीद्वारे देण्यात आली होती व स्मारक चौकात फलक देखिल लावण्यात आले होते.फिजिकल डिस्टंसिंगचे उल्लंघन करणाऱ्या व मास्कचा वापर न करणे याबाबत ही कारवाई करण्यात आली व अतिक्रमण हटविण्याबाबत दुकानदारांना तोंडी सूचना देण्यात आल्या.
सपना वसावा,मुख्याधिकारी
तळोदा नगरपालिका
भाजीपालाच्या टोपल्या खाली उतरवू नका अशी विनंती केली. तरी पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी आमच्या टोपल्या खाली उतरवल्या. अतिक्रमणाबाबत आम्हाला पूर्व सूचना देण्याची गरज होती.इतर दुकानांमध्ये अतिक्रमण आहे तर त्यांचा पण माल रस्त्यावर बाहेर टाकणार का?
लताबाई भोई,भाजीपाला विक्रेत्या तळोदा
Comments
Post a Comment