Posts

डॉ मयूर ठाकरे यांची युवा शारीरिक शिक्षक महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड

Image
क्रीडा प्रतिनिधी नंदुरबार महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,अहमदनगर संलग्न नवीन उद्दिष्टासह, नव्या ध्येयासह युवा शारीरिक शिक्षण शिक्षक राज्य कार्यकारणी क्रीडा दिन निमित्त घोषित करण्यात आली असून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर यांच्या राज्यस्तरीय युवा शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक आज रोजी संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी महासंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाही पद्धतीने जाहीर केल्या . या  युवा कार्यकारणीस कामाचे व निर्णयाचे स्वातंत्र्य  देण्यात आले आहे. या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे- मयूर ठाकरे (नंदुरबार) - अध्यक्ष दिनेश म्हाडगूत (सिंधुदुर्ग) - सचिव सचिन पाटील (कोल्हापुर) - कार्याध्यक्ष  उमेश कडू (चंद्रपूर) - उपाध्यक्ष बाळासाहेब माने (सांगली)- उपाध्यक्ष विजय जाहेर (बीड) - उपाध्यक्ष सचिन पाटील (उस्मानाबाद ) - खजिनदार संजय कांबळे (पुणे)- कार्यालयीन सचिव  पराग गुल्हाणे (वाशीम) - सहसचिव ...

गुणवंत विदयार्थी चा तलोद्यात सत्कार

Image
 तळोदा येथे 10 वी व 12 वीत  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  तळोदा येथे सातपुडा पावरा समाज संघ च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2019 20 या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांचे सत्कार समारंभ पार पाळण्यात आला . यावेळी उद्घाटक म्हणून श्री वेस्ता पावरा -माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून श्री दाज्या  पावरा -पंचायत समिती सदस्य, मार्गदर्शक म्हणून नुकत्याच दुर्गाताई पावरा-  पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण, श्री मुकेश कापुरे अप्पा-ग्रामविकास अधिकारी व संघाचे जिल्हाध्यक्ष श्री मणीलाल नावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करूनकरण्यात आले.  या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना मार्गदर्शक श्री कापुरे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना 10वी 12वी नंतर काय? , सद्या यापुढे येणाऱ्या आपल्या शिक्षणाच्या संधी , प्रत्येक कला, वाणिज्य, व विज्ञान या शाखेतील विध्यार्थ्यांना पुढील उपलब्ध संधी, तसेच विध्यार्थ्यांना अवगत अशा सोप्या भाषेत त्यांच्या पुडील आव्हाने या विषयावर सुंदर अशी मांडणी केली....

भाजप युवा मोर्चा चे निवेदन

Image
भाजपा युवा मोर्चा तळोदा तालुका यांचे निवेदन  धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण करण्यात आली. लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याची मुभा असताना हे महाराष्ट्रातील सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अमानुष मारहाण करत आहे. महाराष्ट्रातील सरकार हे नक्की कोणाचे मुघोलांचे की ब्रिटिशांचे अशी म्हणायचे वेळ आता आलेली आहे. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील साहेब व जिल्हाध्यक्ष हर्षल भाऊ पाटील यांच्या सूचनेप्रमाणे *आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी*  मा.तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले.हया प्रसंगी उपस्थित पराग राणे मा.तालुका उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ,चेतन गोसावी,जितेंद्र लोहार,कैलास माळी,उदय गोसावी,हिमांशू सूर्यवंशी, हर्षल गोसावी,कुणाल माळी आदि उपस्थित होते.

तळोदा शहराला जोडणाऱ्या खड्डेमय रस्त्यांसाठी गुजरात महाराष्ट्रात स्पर्धा कुठले खड्डे जास्त ?

Image
 गुजरात हद्दीतील हातोडा नंदुरबार रस्त्यांचे तीन तेरा तेरा तर  अंकलेश्वर बऱ्हानपूर  मार्गावर  परत येरे माझा मागल्या  तळोदा अक्कलकुवा रस्ताची दूरअवस्था  तर  तळोदा नंदुरबार रस्ताची वाळू वाहतूक मूळ पूर्णतः चाळण झाली आहे,  तळोदा  ते  डेडीयापाडा अंकलेश्वर- बऱ्हाणपूर   म्हणजेच प्रस्तावित शेवाळी  महामार्ग  रस्ताचपूर्ण खड्डेमय झाला असून तळोदा ते अक्कलकुवा अतिशय कमी अंतर असूनही एक ते दीड तास लागत आहे, तर  तळोदा नंदुरबार रस्त्यावर हातोडा पासून पुढे  वाळू वाहतूक मूळ पूर्ण पणे डांबर ची चाळण झाली असुन नंदुरबार अवघ्या काही मिनटं चे अंतर आता तास भर लागतो,  त्यामुळ एकूणच तळोदा शहराला जोडणारे सर्व शहादा रस्ता काही प्रमाणात अपवाद वगळता  अवघड झालं आहे , वैद्यकीय सेवा पुरवत असतांना या मूळ अनेकांचा जीव उपजिल्हा रुग्णालय पावेतो पोहचे पावेतो जाण्याची शकत्या आहे,  अक्कलकुवा येथील भाजपचे जेष्ठ नेते नागेश पाडवी यांनी आज अशीच एक छबी कैद करून फेसबुकवर टाकून आपली नाराजी मार्म...

१५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी पालिकेचे नवीन इमारतीत स्थलांतर

Image
तळोदा पालिकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ तळोदा पालिकेचा नूतन इमारतीचा शुभारंभ सोमवारी साध्या पध्दतीने करण्यात आला.त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते            दीडशे वर्ष्याच्या राजकीय परंपरा असणाऱ्या व खान्देशातील सर्वात जुनी पालिका म्हणून असलेल्या तळोदा पालिकेचे  नवीन इमारतीत स्थलांतर होण्याची प्रतिक्षा बऱ्याच वर्ष्यापासून होती.अखेर आज सोमवार दि १७ आगस्ट रोजी पालिकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाचा पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने सत्यनाराणाची महापूजा करून नूतन वास्तूत पालिकेचे कामकाज सुरु करण्यात आले.          याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा, बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, नगरसेविका सुनयना अनुपकुमार उदासी, नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक भास्कर मराठे,बांधकाम सभापती रामानंद ठाकरे,आदी उपस्थित होते.माजी नगराध्यक्षा विमलबाई सोनवणे,प्रा.विलास डामरे,भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी,डॉ रामराव आघाडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपू...

स्व, अटल बिहारी वाजपेयीं यांना तलोद्यात अभिवादन,,,,,

Image
आज दिनांक 16 ऑगस्ट 2020 वार रविवार रोजी भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजनाचा कार्यक्रम शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या निवासस्थानी घेण्यात आला...यावेळी स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तळोदा शहराचे लोकानियुक्त नगर अध्यक्ष अजयभैय्या परदेशी,  भाजपा शहराध्यक्ष  योगेशभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष प्रा.विलास डामरे ,  नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक रामंनद ठाकरे, नगरसेवक प्रदीप शेंडे,नगरसेवक नितीन पाडवी,तालुका पदाधिकारी शिरीष माळी, प्रफुल्ल बुद्धीसागर , अरविंद प्रधान ,शक्तिकेंद्र प्रमुख रमेश पाटील,संयोजक अविनाश मराठे,कुणाल ठाकरे,संघटन पदाधिकारी व शहर कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तथा कार्यकर्ते उपस्थित होते

कोरोना नियंत्रणासाठी त्रिसूत्री वापर करा,,,, पालकमंत्री मा, के, सी, पाडवी

Image
कोरोना नियंत्रीत करण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा- ॲड. के.सी.पाडवी  जिल्ह्यातील कोरोना नियंत्रीत करण्यासाठी प्रशासन चांगला प्रयत्न करत असून नागरिकांनी नियमित मास्क लावणे, साबणाने नियमित हात धुणे, शारिरीक अंतर राखणे  या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.  भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ॲड.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. एकाचवेळी 750 बाधितांच्या उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाच्या नूतन इमारतीत 100 रुग्णांना ऑक्सिजन आणि 50 रुग्णांना व्हेंटीलेटरची सुविधा असणार...