इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील योगिनी परदेशी हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक


प्रतिनिधी तळोदा :--

इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील योगिनी परदेशी हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

तळोदा येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिराची विद्यार्थिनी योगिनी सुनील परदेशी हिने इस्कॉन मंदिर आयोजित श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून तब्बल ६००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३५०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भाग घेतला. यातून २५ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. 

या अंतिम टप्प्यात आपल्या ज्ञान, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर योगिनीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे सायकल हे बक्षीस जिंकुन शाळेचा तसेच तळोदा शहराचा गौरव वाढविला. योगिनी ही इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तिला शाळेतील शिक्षक रवींद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष श्री निखिलभाई तुरखीया, संचालिका सौ. सोनाबेन तुरखीया,उपाध्यक्ष श्री दगेसिंग महाले,सचिव श्री संजयभाई पटेल ,संस्था समनव्यक चि. हर्षिल तुरखीया यांनी योगिनीच्या यशा बद्दल कौतुकास्पद अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला