संसदरत्न मार्जी खासदार डॉ. हीनाताई गावित यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन


प्रतिनिधी:--( किरण पाटील तळोदा)

संसदरत्न मार्जी खासदार डॉ. हीनाताई गावित यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतकीय जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला संसदरत्न माजी खासदार डॉ. हीनाताई गावित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सामाजिक एकात्मतेचा आणि प्रेरणेचा संदेश दिला.

या प्रसंगी माळी समाज अध्यक्ष तथा नगरसेवक आनंदा माळी, उपाध्यक्ष किसन माळी, नगरपालिका विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक लक्ष्मण माळी, सामाजिक कार्यकर्ते माणिक माळी, संभाजी माळी, पप्पू कुरेशी यांच्यासह माळी समाजातील मोठ्या संख्येने बांधव व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना डॉ. हीनाताई गावित यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातही महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी दिलेला लढा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला