Posts

Showing posts from February, 2021

व्यापारी संकुलावर कोणाचा डोळा ?

Image
गाळे लिलावावर कोणाचा डोळा ?"  प्रतिनिधी तळोदा तळोदा पालिकेचा माध्यमातून  बांधण्यात आलेल्या बहुचर्चित व्यापारी संकुलाच्या  लिलाव प्रक्रिया पार पडत असून एकूण १२७  गाळे लिलावात राहणार  असतील  या मूळ तळोदा शहरातील अनेक किरकोळ व्यवसायिकांना हक्काचे दुकान उपलब्द होऊन सोय होणार आहे , या मूळ पालिकेचा उत्पन्नात भर पडणार आहे,  असे असले तरी या गाळ्यांचा  लिलाव करत असताना  रस्त्याच्या लागून पुढे असणारे काही गाळे लिलावात नसल्याचे सूत्र कडून माहिती मिळाली आहे ,   दरम्यान हे गाळे लिलावात का  नाहीत ?  या बद्दल आता उलट  सुलट चर्चा होत असून पालिका बांधकाम विभागाच्या म्हणयानुसार न्यायालया बद्दल आता कोणतेही अडचण नाही ,     मात्र  रस्त्यालगत असणाऱ्या  खालच्या मजल्यावर मोक्याच्या जागेचा लिलाव यात नाही या बाबतीत अधिक माहिती घेतली असता एक लाखाचा वर असणाऱ्या गाळ्यांचा असा ऑन लाईन लिलाव होऊ शकतो असे प्रशासन कडून सांगण्यात आले         सदर व्यापारी गाळे ज्या बांधकाम ठेकेदारास काम देण्यात आले होते त्याच बिल अजून...

सातपुड्यातील आव्हान पार करणारी ताई

Image
शासकीय यंत्रणेतील  महिला कर्मचारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावताना विशेष प्रयत्न करून चांगली कामगिरी करतात. आपल्या प्रयत्नातून काही चांगले घडावे असा त्यांचा प्रयत्न असतो. जिल्ह्याच्या कोणत्या तरी भागात त्यांचे काम शांततेत सुरू असते. अशा महिलांची कामगिरी ‘आम्ही साऱ्याजणी’ या शिर्षकाखाली प्रातिनिधीक स्वरुपात देत आहे.  महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चपर्यंत विशेष वृत्त स्वरुपात ही माहिती देण्यात येईल. दुर्गम भागातील आव्हानांना सक्षमपणे सामोऱ्या जाणाऱ्या हिराबाई - अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या उंचवाडीचा डोंगराळ परिसर.... डोंगरामधून वाहणारी अरुंद पात्र असलेली नदी.... डोंगराच्या वरच्या भागाकडे गेल्यावर स्वच्छ, सारवलेले आणि बांबूच्या तट्ट्यांनी वेढलेले घर...हीच गावातील अंगणवाडी....नवख्या माणसाला चढताना दम लागतो. पण अंगणवाडी सेविका हिराबाई पाडवी यांच्यासाठी हे सोपे आहे. इथल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे. शहरातील माणूस जेव्हा या भागातील पावसाळी परिस्थितीची कल्पना करतो तेव्हाच त्याला हिराबाईंच्या कामाचे महत्व आणि त्यातील आ...

अनेकांचा अरुणोदय करणारे आदरणीय भाऊ,,,

Image
आजात शत्रू  भाऊ मृदुस्वाभाव, मितभाषी ,अजातशत्रू ,आबालवृद्धांना हवेहवेसे ,सर्वस्पर्शी ,सामाजिक बांधिलकी असणारे ,निसर्गमित्र,प्राण्यांवर भूतदया असणारे,हौशी व मित्रांमध्ये रमणारे भाऊ अशी ज्यांची ओळख असे आमचे आधारस्तंभ, पाठीवर कौतुकाची थाप मारून लढ म्हणणारे व जिंकण्यासाठी सतत बळ वाढवून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री अरुण कुमार गोरखनाथ महाजन  तारुण्यात अपार कष्ट व लोकसंपर्क वाढवून ,आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून आम्हाला मार्गदर्शन करताना भाऊ आम्हाला एक दीपस्तंभ भासतात व दिशाहीन व निराश जहालेल्या ना यशाचा मार्ग दाखवतात हेच त्यांचे मोठेपण *आदरणीय आमचे भाऊ*           अध्यापक  शिक्षक मंडळ धुळे - नंदुरबार  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  शिक्षण महर्षी प्राचार्य भाई  साहेब गो,हू,महाजन यांच्या कुटुंबातील जेष्ठ सदस्य म्हणून त्यांची ओळख असली तरी   भाई साहेबांच अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यमान अध्यक्षा सौ, मंगलाताई महाजन यांच्या पाठीमागे नव्हे तर सोबत उभं राहून या वटवृक्षाचा  विस्तार अधिक मोठा करण्यात भाऊ...

पानांचा सोबत दुसऱ्यांच्या जीवनात रंग भरणारा मित्रांचा सदैव स्मृतीराहणारा स्व, राजेश उर्फ बंडू पाटील ,,,आज सहावा स्मृतिदिन

Image
एक आठवण बंडू ची !      तळोदे शहरातील मुख्य बाजारपेठे तील स्मारक चौकात असणारी   पानदुकान,  " राजेश पान सेंटर " आजही , अनेक तळोदेकरांचा मनात घर करून आहे...ते फक्त बंडूमुळेच..         शाळकरी वयातच बंडू ने पानटपरी  चालवणे सुरू केले .आणि थोड्या च कालावधीत , आपली मेहनत, जिद्द, चिकाटीने टपरी चा विस्तार केला.....         हातमजूर ते ठेकेदार, काँट्रॅक्टर, राजकीय,  सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांची ती एक हक्काची पान टपरी होती .   अनेकांना रात्री बंडूच्या  हातून पान, घुटका खाल्ल्या शिवाय झोप लागत नसे.    बंडू च्या टपरी वरील कलकत्ता मिठा पान खाने म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होत...         बंडू ची स्मरणशक्ती जबर होती ..गिर्हाइकाची पंसद माहित असे, नुसती  सावली बघून  मनासारखे पान, घुटका समोर मांडत असे .       नंदुरबार ते सुरत पट्ट्यातील अनेक पान गादी वाले बंडू चे मित्र होते त्यांच्या कडून टपरीवर लागणाररी उच्च दर्जाची  पाने मागवित असत.     ...

शिवजयंती निमित्त तलोद्यात विविध उपक्रम

Image
प्रतिनिधी तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो,हु. महाजन व शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात तळाेदे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त निमित्ताने...      शिवाचरित्रांचा प्रेरणादायी उपक्रम...काेवीड १९ च्या पार्श्वभूमीवर  राबविण्यात आला  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी हाेता आले नाही ...परंतु work from home व online च्या माध्यमातून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला..यांत पोवाडे, शिवगर्जना-घोषणा,कविता,नृत्य नाटिका सादर केल्यात.या बरोबरच विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या शिव चित्रांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले..  या  प्रदर्शनाला शाळेचे सन्माननीय प्राचार्य ए.एच. टवाळे , उपमुख्याध्यापक  एस,एम.महिरे, पर्यवेक्षक आर सी माळी, पर्यवेक्षक एन.जी. माळी तसेच   सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा, अमरदिप महाजन , जेष्ठ शिक्षक प्रा. बी,जी, माळी  उल्हास केदार आदींनी  गड किल्लयांची प्रतिकृती व चित्रांची पाहणी  करण्यासाठी प्रदर्शन स्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांना दाद दिली...🚩🙏 ...

शिवजयंती निमित्ताने सुरक्षित अंतर ठेवत तलोद्यात विविध उपक्रम साजरे

Image
प्रतिनिधी तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो,हू, महाजन व शी,ल, माळी कनिष्ठ महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त निमित्ताने... शिवाचरित्रांचा प्रेरणादायी उपक्रम...काेवीड १९ च्या पार्श्वभूमीवर  राबविण्यात आला  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी हाेता आले नाही ...परंतु work from home व online च्या माध्यमातून    या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला..यांत पोवाडे, शिवगर्जना-घोषणा,कविता,नृत्य नाटिका सादर केल्यात.या बरोबरच विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या शिव चित्रांचे प्रदर्शन विद्यालयात भरवले...  या  प्रदर्शनाला शाळेचे प्राचार्य अजित  टवाळे , उपमुख्यद्यापक एस,एम, महिरे, पर्यवेक्षक आर सी माळी, पर्यवेक्षक निलेश माळी  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा,   अमरदिप महाजन , बी,जी, माळी  उल्हास केदार आदींनी  गड किल्लयांची प्रतिकृती पाहणी  करण्यासाठी प्रदर्शन स्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांना दाद दिली प्रदर्शनात पाहणी करताना प्राचार्य अजित  टवाळे सांस्कृतिक विभाग प्रमु...
Image
  रस्त्याच्या भूमिपूजनाने स्वप्नपूर्तीचा आनंद- ॲड.के.सी.पाडवी तळोदा/प्रतिनिधी,दि.14: असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत  बनविण्यात येणाऱ्या  रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करुन स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला आहे. शालेय जीवनापासून पाहिलेले रस्त्याचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.  नकट्यादेव येथे असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष सीमा वळवी,  जि.प.चे समाज कल्याण सभापती रतनदादा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, जि.प.सदस्य प्रताप वसावे आदी उपस्थित होते.  श्री.पाडवी म्हणाले,तीन वर्षांचा असतांना या रस्त्यावरुन सर्वप्रथम पायी चाललो होतो. त्यावेळी आम्ही पाच विद्यार्थी 28 किलोमीटरचे अंतर पायी चालायचो. शिक्षण घेतल्यानंतर या रस्त्याचे काम व्हावे अशी इच्छा मनात...

तलोद्याचे राजकीय भीष्म भरत भाई

Image
तलोद्याचे राजकीय केंद्रबिंदू भरत माळी - तळोदा शहराच राजकारणात मागील ३० वर्षपेक्ष्या अधिक काळ राजकीय केंद्रबिंदू म्हणून भरत माळी हे नाव तळोदा शहरात नव्हे तर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये घेतले जात शहरातील राजकारणात इतरही नेते प्रभावशाली आहेत मात्र भरत माळी या यांचा राजकीय कित्ता कोणालाही कायम स्वरूपी गिरवता आला नाही सतत गेल्या ३० वर्षापासून  तळोदा शहरात विविध   राजकीय   उलथापालथी मध्ये त्यांचा सहभाग हा असतोच अनेक राजकीय चढउतार त्यांनी बघितले शहादा येथे विध्यार्थी दशेत असतांना भरत माळी यांनी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकीत सहभाग नोंदविला ,तर तळोदा महाविद्यल्यात देखील विद्यार्थी प्रतिनिधी चा निवडणुका त्यांनी गाजवल्या आहेत , पूर्वाश्रमी चे काँग्रेस चा वारसा लाभला असला तरी तळोदा शहर भाजप प्रेमी असल्याने  देखील त्यांचा स्वतःचा सर्वसमाजातील दांडगा राजकीय संपर्क मूळ काँग्रेस पक्ष नेहमीच वरचढ दिसून आला आहे याचा अनुभव अनेकदा आला आहे  ,  अनेकदा चिन्ह न वापरता स्व बळावर त्यांनी राजकीय  ताकद दाखवून दिली आहे,   अतिशय तरुण वयात २४ व्या नगराध्यक्ष झालेत त्यान...

सातपुड्यात स्टोबेरी पीकाचे यशस्वी उत्पादन

Image
सातपुड्याच्या डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून लागले आहेत. इथले हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धिरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे. धिरसिंगला शिक्षण घेता आले नसले तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे  शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे आणि त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली. डाब येथे 2007 पासून स्ट्रॉबेरी लागवड होत आहे. मात्र शेतकरी पारंपरिक पद्धतीने ही लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णत: यश ...

अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा द्या,,,, रक्षताई खडसे यांची मागणी

Image
अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात यावे यासाठी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे मागणी.खासदार रक्षा खड़से. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे भाग्य उजळणार..  -बऱ्हाणपूर हा रावेर लोकसभा क्षेत्रातील शेती पट्ट्यातील अत्यंत महत्वपूर्ण मार्ग असून  गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातील वाहतूक सुरू असते. केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.  तळोदा  शहादा तालुक्यातील शेतकरी ना सुद्धा याचा फटका बसत असून त्याच सोबत खाजगी वाहन चालकांना  बसेस यांचे देखील हाल होत आहेत  निधीची कमतरता भासत असल्यामुळे नियमित दुरुस्ती व देखभाल होत नाही. ज्यामुळे रस्त्याची दुर्दशा होत आहे. गंभीर अपघात झाल्यामुळे जीवितहानी सोबत मालाचे नुकसान होते. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होते आहे. हा राज्य महामार्ग जर राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आल्यास केंद्राकडून नवीन पद्धतीने व आधुनिक मशिनरीच्या साहाय्याने चौपदरीकरण बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध ह...

सरपंच निवडणूक कडे लक्ष लागून

Image
 ग्राम पंचायत निवडणुकी नंतर सदस्य  अज्ञात स्थळी रवाना   सरपंच व सदस्य   ठरविणार  ग्राम पंचायत कोणाची ?   कोणता पक्ष सत्तेत  नुकत्याच पार पडलेल्या तळोदा  तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये विजयी झालेले   काही ग्राम पंचायत चे सदस्य   सरपंच  पदाचे आरक्षण सोडत (पुरुष) (महिला)  कोणती राहिल  हे उघण्यापूर्वीच पूर्वी  अज्ञात स्थळी रवाना झाले असून  सरपंच पदाची निवड कधी होईल हे अद्याप स्पष्ट नसले तरी आता पासून वरिष्ठ पातळीवरून या बाबत दक्षता बाळगली जात आहे,  तळोदा तालुक्यातील सात ग्राम पंचायत च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून  *सरदार नगर*  *राणीपुर* *पाडळपूर* *नर्मदानगर* *रोझवा पुनर्वसन* *ग्रामपंचायत रेवानगर*  *बंधारा*  या ग्राम पंचायत मध्ये सरपंच कोण बसतो या कडे लक्ष लागून आहे, *चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा दावा* तळोदा तालुक्यात   काँग्रेसने नर्मदानगर, रेवानगर, बंधारा, पाडळपुर या चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसने दावा केला आहे. निकाल नंतर माजी मंत्र...

सातपुड्याच्या उंच टेकड्यामध्ये प्यारागेयडिंगचा प्रयोग !!!

Image
  सातपुड्याच्या उंच टेकड्यामध्ये  प्यारागेयडिंगचा प्रयोग !!!  ते कोण होते ते अजूनही गुलदस्तात ? कालिचरण सूर्यवंशी/तळोदा :                      सातपुड्याच्या दुर्गम भागात  धडगाव  तालुक्यातील राजबर्डी भागात   काकरदा च्या एक उंच टेकडीवरून  सोबत काही साहित्य  घेऊन एक माणूस   खोल दरीत  अचानक उडी घेतो हे पाहताच तरुणांचा एकच गल्ला होतो,  मात्र क्षणार्थत दिसेनासा होणारा तो माणूस हवेत पक्षी सारखा उडू लागतो हे पाहताच तरुण बुचळल्यात पडतात  हळूहळू पक्षा प्रमाणे उडणारा तो  माणूस खाली उतरतो  त्यांचा  वैमानिक  सारखा ड्रेस पाहून काही वेळ कोणीही त्याचा जवळपास जात नाही, मात्र सदर व्यक्ती हिंदी तुन बोलू लागल्या नंतर मात्र सवांदास सुरुवात होते.  हा प्रसंग आहे  धडगाव तालुक्यातील  दुर्गम राजबर्डी भागातील  या ठिकाणी  काही  हौशी प्यारा ग्लाआईड करणारे व्यक्ती या ठिकाणी आले होते सोबत तीन चार लोक होते. याचा व्हिडीओ शूट एक तरुणाने केला असून त...