Posts

Showing posts from November, 2020

राजकारण बाजूला अगोदर मैत्री

Image
  तलोद्यात पोलिसांनी निभावली वन विभागाची भुमीका बिबट्याला पळविले राजकारण बाजूला अगोदर मैत्री बिबट्याला घाबरून झाडावर चढेलेल्या माजी नगरसेवकाना उतरविण्यासाठी गेले नगराध्यक्ष   कालीचरण सूर्यवंशी/तळोदा          धडगाव तालुक्यातील येथील कुंबी येथील नातेवाईक तळोदात आल्याने त्यांना भेटण्यासाठी चिनोदा शिवारातील शेतात गेलेल्या तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते  रूपसिंग पाडवी यांना चक्क तीन बिबट्याचे दर्शन झाले. तीघा बिबट्याना पाहून भेदरलेल्या पाडवी यांनी स्वतःच्या व नातेवाईकांच्या बचावासाठी झाडावर तयार केलेल्या मचाणावर चढले. त्यांना उतरविण्यासाठी थेट तळोद्याचे नगरसेवक अजय परदेशी व इतर यंत्रणा घटनास्थळी पोहचले व त्यानंतर पाडवी यांना झाडावरून खाली उतरले.       याबाबत सविस्तर माहिती अशी की तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रुपसिंग बिरबा पाडवी याचे मूळ गाव धडगाव तालुक्यातील कुंबी येथील नातेवाईकाना मजुरांना व इतर नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील चिनोदा येथे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान गेले होते. दरम्यान...
Image
  नंदुरबार शहरात आढळला दुर्मीळ 'चापडा' सर्प यापुर्वी शहरी भागात तो कोठेही आढळलेला नाही. कालीचारण सूर्यवंशी/तळोदा              नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली, नवनीत हॉटेल च्या परिसरात दुर्मीळ चापडा ( बांबू पिट वायपर ) हा अतिविषारी व सहसा आढळून न येणारा सर्प आढळून आला. अजय देवरे यांनी लागलीच वन्यजीव संरक्षण संस्था चे सदस्य जितेंद्र सांगळे (नंदुरबार पोलीस) यांना कॉल केला आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन शास्त्रशुध्द पध्दतीने सुरक्षितरित्या साधारण 2 फूट लांबीचा 'चापडा' सर्पाला रेस्क्यू केला. सापाची रीतसर वन विभाग मध्ये नोंद करून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.  'चापडा' हा अत्यंत विषारी असून चापडा किंवा हिरवी घोणस या नावाने ओळखला जाणारा हा सर्प प्रामुख्याने झाडांवर तसेच झुडुपांवर वेलींवर अधिवास करतो. याचा पोटाकडचा भाग  पिवळा असून पाठीवरचा भाग हा हिरवा असतो. डोके याचे त्रिकोणी आकारात असते. याचे वास्तव्य हे जास्त करून जंगलात आढळते. पक्षी, त्यांची अंडी पिल्ले, सरडे उंदीर हे त्याचे खाद्य असते. हा अंडी न घालता डायरेक्ट पिलाला जन्म देणारा साप आहे....

"कोरोनाच्या नावाने पक्षी गणनाचे चांगभलं "

Image
"कोरोनाच्या नावाने पक्षी गणनाचे  चांगभलं " कोरोनाच्या बहाण्याने  पक्षी गणना यंदा झालीच नाही कालीचारण सूर्यवंशी/तळोदा                तळोदा वनक्षेत्रात मागील दोन वर्षपासून पक्षी गणनाच झाली नाही यंदा कोरोना च कारण सांगत वेळ मारून नेली असली तरी मागील वर्षी कोणतेही कारण नसताना या मोहिमेचा विसर वन विभागाला पडला होता यंदा देखील तोच प्रकार झाला असून  शासनाचा विविध योजना ज्या वन विभागाकडून राबविले जातात त्यात आर्थिक निधी तरतूद असते त्यात मात्र  कागदावर वृक्षारोपण साठी फोटो शेशन करून फाईल केली जाते  मात्र तळोदा वनक्षेत्रात रानपिंगळा, गिधाड सारखे दुर्मिळ पक्षी असून देखील त्याच कोणतेही सोय सुतक वन विभागाला वाटत नाही हे दुर्देव म्हणावं लागेल  वास्तविक तळोदा वनक्षेत्रात दुर्मिळ वन्यजीव शोधण्यासाठी बाहेरून पक्षी मित्र भेटी देत असतात मात्र स्थानिक वनक्षेत्रपाल मात्र तळोदा वनक्षेत्रातील वैभवशाली होऊ शकणाऱ्या नोंदी घेण्यास निरुत्साही दिसून येत आहेत       ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवस (५ नोव्हेंबर) त...

आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते राणीपुर मालदा येथील वनपट्टे धारकांना दाखले वाटप

Image
तळोदा तालुक्यात आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते अदिवासी बांधवाना वनपट्टे वाटप तळोदा तालुक्यातील मालदा व राणीपुर गावातील बांधवाना शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेशजी पाडवी साहेब यांच्या हस्ते 35 ते 40 वर्षा पासुन प्रलंबित असलेले वनपट्टे वाटप करण्यात आले या वेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले या वेळी आमदार पाडवी बोलताना सांगितले सर्व प्रलंबित असलेले वनपट्टे देणाचे माझे प्रयत्न आहेत 40 ते 50 वर्षा पासुन प्रतिक्षेत असलेल्या बांधवानी चिंता करण्याची गरज नाही आपल्याला आपल्या हक्काच्ये वनपट्टे मिळतील यांचा साठी माझा प्रयत्न आहेत कोणालाही काही अडचणी येत असतील तर माझ्याकडे संपर्क करा असे सांगितले तसेच आज मालदा व राणीपुर या दोघा गावांमधील नागरिकांना 58 वनजमीन मंजुर प्रमाणपत्र वाटप केले तसेच रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, सातबारेही वाटप करण्यात आले. या वेळी शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राजेश पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत दादा ठाकरे, जि.प.सदस्य प्रकाश दादा वळवी, तळोदा तहसीलदार वखारे साहेब, नायब तहसीलदार राठोड साहेब, संरपच युनियन अध्यक्ष बळीराम पाडवी,अदिवासी मोर्चा जिल्हा स...
Image
प्रतिनिधी तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे दिवंगत माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातील दिलवरसिंग पाडवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.         यावेळी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, अक्कलकुवा जिल्हा परिषद गटाचे सदस्य कपिल चौधरी, भाजपाचे जिल्हा संघटक निलेश माळी, भाजपाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष तथा खापरचे उपसरपंच विनोद कामे, बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.दिनेश खरात, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्र्वास मराठे,पं.स.सदस्य ॲड.सुधिर पाडवी,दलित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बापू महिरे, संदिप मराठे, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील, जयेश चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष किर्तीकुमार पाडवी, सचिव प्रभाकर ऊगले...

भाजपचे नेते सेनेच्या संपर्कातून प्रवेशाची संकेत तर भाजपचे तालुका अध्यक्ष भाजप ग्रुपमधून लेफ्ट

Image
  भाजपचे नेते सेनेच्या संपर्कातून प्रवेशाची चर्चा  तळोदा : तळोदा शहरातील पालिका निवडणुकी पूर्वी ज्यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला होता व निवडणूक भाजप कडून लढवली होती , ते आता स्वगृही परतण्याचे संकेत मिळत असून  जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊस वर माजी पूर्वी सेनेत असणारे व सध्या भाजपात असणारे अनुप उदासी तर  भाजपचे उपजिल्हाध्यक आनंद सोनार यांनी भेट घेतली असून या ठिकाणी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे,  तर दुसरी कडे  भाजपच्या एक तालुका पदाधिकारी  ने राजीनामा दिल्याची चर्चा  सुरू आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे, दरम्यान अनुप उदासी यांची पत्नी सध्या भाजपाची  विद्यमान नगरसेविका असून पूर्वश्रमीचे दोघे शिवसेनीक सोबतच भेटीला गेल्याने चर्चेस उधाण आले आहे  यावरुन एकंदरीत एकनाथराव खडसे यांच्या सोडचिठ्ठी नंतर तळोदा भागातून कोण कोण  राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार ?  या बाबत चर्चा  असतांना पालिका निवडणुकी पूर्वी भाजपात आलेले क...

सहयोग ग्रुप कडून रुग्णालयात रुग्ण साठी दिवाळी भेट,,,,

Image
सहयोग सोशल ग्रुप द्वारे उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथील महिला रुग्णांना दिवाळी भेट....       कोरोना संक्रमण काळात प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आढळते. त्यात दिवाळी सण वर्षभरातून एकदा येणारा आनंदाचा क्षण, पण कुटूंबातील स्त्री जर आजारी असेल तर त्यांची ही दिवाळी दुःखाच्या गर्द कालोखात सापडते.मगआजाराच्या वेदनेपासून मुक्ततेसाठी अथवा बाळंतपण सुखरूप व्हावे दवाखान्यात दाखल व्हावे लागते. मग दिवाळी सण साजरा करण्यासाठी होणारी पूर्वतयारी व खरेदी शक्य होत नाही. अशा सर्वांना मदतीचा हात म्हणून आज दिनांक 6 11 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांना दिवाळीनिमित्त साडी वाटप करण्यात आले.तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश केदार साहेब व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मनीषा पाटील यांच्या हस्ते रुग्णालयातील 20 महिला रुग्णांना दिवाळी भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले. कोरोना संक्रमण काळात दिवाळीचे फटाके वाजवून धूर करण्यापेक्षा रुग्णांच्या चेहर्‍यावर काही काही काळ हसु आणू शकू.. असा उद्देश सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांचा आहे. असे अध्यक्ष श्री ऍड अल्पेश जैन यांनी कार्...
Image
भाजपपेक्षा काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीत जाण्यासाठी उत्साही....?   तळोदा / प्रतिनिधी             नंदुरबार जिल्हा सह तळोदा  शहर व तालुक्यातील मधील भाजप अंतर्गत लाथाळ्या सर्वश्रुत असतांना खान्देश मधील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवे श नंतर  पक्षाचे सर्व्हसर्वा पवार साहेबांनी उत्तर महाराष्ट्रात मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतः एकनाथराव खडसे     प्रत्येक तालुक्यात भेटी देऊन  भाजप मधील जुन्या कार्यकर्ते व काही  काँग्रेस  मधील  नाराज स्थानिक नेते बडे नेते आपल्या कडे कसे येतील या करिता प्रयत्न करतील मात्र  त्या पूर्वीच काहींनी  स्वतः नाथाभाऊंशी  तळोदा इथं भव्य कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून डिसेंबर जानेवारीत  नंदुरबार , शहादा ,तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, या ठिकाणी मेळावे घेऊन यावेळी राष्ट्रवादीत अनेकांचे प्रवेश होणार आहेत, यात तलोद्यातील    भाजाप पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी, प्रवेश ...

शहाद्यात काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

Image
शहादा तालुक्यातील संरपच उपसंरपच सह असंख्य कार्यकर्ताचा काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश शहादा तालुक्यातील आमदार राजेश पाडवी साहेब यांचा उपस्थितीत सोमावल येथे निवासस्थानी संरपच उपसंरपच सह 250 कार्यकर्ताचा काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला भाजपाचे जेष्ठ नेते यांनी श्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्या नंतर बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात ग्रुह मंत्री चा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे भाकित केले होते. पंरत तसे न होता दि 2 नोव्हेंबर रोजी शहादा तालुक्यातील  कुढावद,पाडळदा, पिपळोद,जावदा, नवलपुर, वाडीपुनर्वसन, लाचोरा, या गावातील संरपच उपसंरपच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्तानी आमदार राजेश पाडवी यांचे विकास कार्य बघत यांनी भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला या वेळी आमदार राजेश पाडवी बोलताना म्हणाले कि प्रत्येक शेतकरी बांधवांचा कामाला मी प्राधान्य देईल शेती साठी पाणी, विज, शेतशिवार रस्ते बनवण्यासाठी माझे पहिले प्राधान्य राहील तसेच शेतकरी राजा यांना या सुविधा भेटल्यातर मजुरांना यांचा फायदा होईल उसाचा तसेच ...