जा रे बुका उचली लय....

जा रे बुका उचली लय.... तळोदा शहरात पुढारी बनण्याचे स्तोम अधिकच वाढले असून स्वयं घोषित नगरसेवक पासून ते स्वयं घोषित नेत्यांनी सर्व हद्द पार केल्या असून राजकारण सोबतच सार्वजनिक कार्यक्रम असल्यास त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी पाळ्ल्या पाहिजेत याची एक निश्चित अलिखित आचार संहिता असते मात्र तळोदा शहरात अश्या पुढाऱ्यांनी कहर केला असून एखादा सार्वजनिक कार्यक्रम अथवा राजकीय कार्यक्रम असल्यास तिथं प्रमुख मान्यवराना स्वागतासाठी अर्थताच महागडे बुके आणले जातात मात्र सत्कार स्वीकारल्यानंतर मान्यवर बुके तिथच ठेवतात याच बुके वर काही बडे जॉव मिळवण्याची हौस असणारे कलाकार लक्ष ठेवून असतात कार्यक्रम संपला की आपल्या पंटर करवी ते महागडे बुके उचलेले जातात तसा आदेशच असतो.... जा रे बुका लेके आ.... जा रे बुका लई ये...... गुपचुप शहरात अनेकांचे वाढदिवस असतात तालुक्यात अनेकांचे वाढदिवस असतात नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक प्रमुख नेत्यांचे वाढदिवस असतात अशावेळी संधी साधून हा कार्यक्रम रीतसर पार पाडला जातो त्यात नंदुरबारचे बुके तळोदा व तळोदा येथील बुके नंदुरबा...