Posts

तळोद्याची प्राची गोसावी जिल्ह्यात तृतीय तर केंद्रात प्रथम

Image
माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2020 च्या निकाल जाहीर झाला असून गो. हू महाजन न्यू हायस्कूल ची विद्यार्थीनी प्राची रवींद्र गोसावी हिने 96. 40% गुण मिळवत नंदुरबार जिल्ह्यात तिसरा क्रमांक व तळोदा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय तळोदा येथील विद्यार्थीनी खुशी संजय अग्निहोत्री हिने 94.80% गुण मिळवत केंद्रात दुसरा तर नेमसुशील विद्यामंदिर तळोदा येथिल विद्यार्थीनी हिरल मनोज मगरे हिने 94.40% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.         सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांकडून कौतुक केले जात आहे.                कु, प्राची गोसावी       प्रा, गो,हू, महाजन हायस्कुल तळोदा                         कु, खुशी  अग्नीनिहोत्री           कन्या विद्यालय तळोदा             ...

कु,प्राची गोसावी जिल्हात तृतीय तर केंद्रांत प्रथम

Image
शिक्षण महर्षी  स्वातंत्र्य सेनानी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन व शी,ल, माळी कनिष्ट महाविद्यालयाची विध्यार्थीनी  कु, प्राची गोसावी जिल्हात तृतीय व तळोदा केंद्रात प्रथम येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु,प्राची रविंद्र गोसावी केंद्रात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय आली आहे. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून एकूण ३३७ विद्यार्थ्यांपैंकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.... महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यात प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून प्राची रविंद्र गोसावी ही ९६.४० टक्के मिळवून केंद्रात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्राजक्ता तुकाराम वळवी व प्रगती पवनकुमार दिक्षित या दोन्हींनी ९३.९० टक्के मिळवून शाळेत संयुक्तपणे द्वितीय तर दामिनी जगदिश परद...

एक क्रीडाप्रेमी चा दुर्देवी अंत

Image
एक उत्साही तरुणाचा दुर्देवी अंत,,,,,,, समीर  शेख तलोद्यातील  सर्वच मैदानावर सतत हजेरी लावणारा  कबड्डी, थाळी फेक, भाला फेक, हॅन्डबॉल खेळात पारंगत असा तरुण उमदा खेळाडू.  खेळत असतांना शिक्षण देखील या उमद्या तरुणाने सुरू ठेवल होतं. हिंदी विषयांत बी,ए, व  नंतर बी,एड, व  एम,ए, देखील केलं. याच पदवी व प्रामाणिक पणा च्या शिदोरीवर प्रतापपूर इथं  उपशिक्षक म्हणून काम केलं होतं. तळोदा शहरात कोणत्याही  मैदानांवर  स्पर्धा असली की समीर तिथं कुठंतरी स्पर्धेचा आनंद घेतांना दिसत असे. परिचय असो अथवा नसो खेळाडूला मार्गदर्शन  देण्याची आवड त्याला असायची . त्यामुळे सर्वच हाडाचे क्रीडा शिक्षक त्याला नावाने परिचित होते,  शरीर संपदा टिकविण्यासाठी सदैव मेहनत व्यायाम याला वेळ देत असे. त्याला मी नेहमी लोखंड म्हणायचो कारण त्याच शरीर  एकदम मजुबत होतं.  व्यायामच व्यसन- समीर ला  व्यायाम ची प्रचंड आवड सतत व्यायाम करत असे  त्याने  घरी देखिल स्वतः काही साहित्य तयार करून ठेवल होत तिथं तो नियमित  व्यायाम करत  होता,   धर्म जात ...

माझा आधारवड हरपला,,,, प्रतिभा ताई शिंदे

Image
नाना साहेब जे. यू.ठाकरे यांचे आज कोरोना शी संघर्ष करता करता निधन झाले , लोकसंघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे यांच्या शब्दांतून संवेदना माझा पुरोगामी चळवळीतील आधारवड आज हरवला प्रतिभा शिंदे, लोक संघर्ष मोर्चा १९८८ चे वर्ष साक्री येथे १४ व १५ फेब्रुवारीला बाबा आमटे नी काढलेली पहिली भारत जोडो यात्रा साक्रिला ला येणार त्या वेळी पहिल्यांदा नाना साहेबांची ओळख झाली , नानांच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये मी शिकत होती आणि शाळेत भरवल्या जाणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवर मी जायचे नानांनी भारत जोडो यात्रेची तयार करण्याचे साठी आख्या साक्री तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये आम्हाला सायकलवर पाठवले प्रत्येक गावातून पापड,कुरडया ,धान्य गोळा करण्याचे काम व १४ ला सकाळी प्रत्येकाच्या घरावर गुढी अंगणा समोर रांगोळी काढण्याचे  आवाहन  करत आम्ही महिना भर फिरत होतो , १०विचे वर्ष घरच्यांचा पूर्ण राग नाना साहेबांवर १४ तारखेला बाबा व भारत जोडो  यात्रा साक्री त आली आमचे आख्ख गाव गुढी ,रांगोळी ,फटाके अस सणा सारखं देखण सजल होत सर्वान मधे नव चेतना कोण तो उत्साह सायंकाळी महिला मेळावा त्यात मी युवती ...
Image
तळोदा येथील डॉ शशिकांत वाणी यांची मालेगांव प्रभारी म्हणून भाजप  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये कार्य। समितीत राज्यातील काही प्रभारी ची नावांची घोषणा केकी यांत डॉ शशिकांत वाणी यांची मालेगांव जिल्हा प्रभारी म्हणून नेमणूक  करण्यात आली असून वाणी यांची ओळख भाजप मधील एकनिष्ठ कार्यकर्ते ते एक एकनिष्ठ नेते म्हणून प्रदेश पातळीवर  ओळख असून संघटन कडून या  अगोदर त्यांचा कडे प्रदेश कार्यसमिती सदस्य, भाजप जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सचिव आदिवासी आश्रम शाळा  संघटन तसेच धुळे विधानसभा प्रभारी या अगोदर काम पाहिले आहे, आता पक्षाने त्यांच्यावर मालेगांव ची जबाबदारी टाकली असून पुढील तीन वर्षे साठी मालेगांव भागातील सर्व निवडणुकीत त्यांची भूमिका पक्ष प्रतिनिधी म्हणून मोलाची ठरणार आहे, भाजपला यश मिळवून देणे या साठी त्यांची जबाबदारी वाढली आहे
Image
 तळोदा तालुक्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी महत्त्वाचे असणारे लघु प्रकल्प काही  अल्प प्रमाणात  भरत असले तरी त्याची गळतीही दरवर्षीप्रमाणे सुरू झाली असून  येथील होणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी उन्हाळ्यात किरकोळ जलसाठा जेमतेम नावाला शिल्लक असतो या बाबत परिसरातील शेतकरी वर्ग कडून अनेकदा त्रकार करून देखील या कडे डोळेझाक होताना दिसत आहे,  यात गढावली व रोझवा या दोन प्रकल्पांनी तर पावसाळ्या पूर्वीच तळ गाठल्याने कोरडे झाले होते,  तर पाडळपूर येथे फक्त मान्सूनपूर्व 34 टक्के व  सिंगसपुर लघु प्रकल्‍पात 55 टक्‍के पाणीसाठा शिल्लक होता . त्यामुळे या लघु प्रकल्पांच्या भिंतींना लागलेली गळती दुरुस्त होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यात तालुक्यात यंदा पाऊस अजूनही दमदार झालेला नाही , त्यामुळं येणाऱ्या काळात पाऊस कमी झाल्यास अडचण होऊ शकते ,        तळोदा तालुक्यात कोणतेही मोठे धरण नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊ...

*वृक्ष हेच व्हेंटिलेटर वृक्ष हेच जीवन,* मेधाताई पाटकर

Image
शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन  नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे 'वृक्षदिंडी' काढून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात एका जागो रे भिला याने गाण्याने करण्यात आली. गावात रोपांचे वाटप करून  कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.              या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य खरबाडे गावित व प्रा.बोराडे सर, नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधाताई पाटकर, लतिका राजपूत, खेमसिंग पावरा, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, माजी पंचायत समिती सभापती, शहादा डॉ.सुरेश नाईक, ईश्वर पाटील,फुले-आंबेडकर स्टडी सर्कलचे अनिल कुवर आदी उपस्थित होते.          चिखली पुर्नवसन वसाहतीच्या नागरिकांनी दिंडी काढून वृक्षारोपण कार्यक्रम केला. यावेळी मेधाताई पाटकर म्हणाल्या की,  वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. झाडं, जंगल हा आदिवासींच्या जगण्याचा व त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्यामुळे त्यांनी जंगलरक्षक दल बनवून आपल्या डाया डायांनी जंगल वाचवलं, सातपुड्यात रस्ते पोचले नव्हते, त्यामुळे बाजार नव्हते त्यावेळी जंगल टिकून होते. ...