डॉ शशिकांत वाणी यांना संघटनेचे मोठं पद कधी मिळणार ?
भाजपाची प्रदेश स्तरावर विभागीय, व संघटनेचे महत्वाची पदा बाबत नुकतीच जबाबदारी देण्यात आली यांत नंदुरबार जिल्हातील जेष्ठ भाजप नेते तळोदा येथील डॉ शशिकांत वाणी यांच्यावर कुठंतरी अन्याय झाल्याची भावना भाजपचे जिल्हातील एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्यात दिसत आहे, संघटन पातळीवर प्रामाणिक असणाऱ्या डॉ शशिकांत वाणी यांचा राजकीय प्रवास पहिला असता जिथं उमेदवार नसेल पक्ष अडचणीत असेल अश्या वेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली तर काही वेळा लादण्यात आली मात्र ज्या वेळी त्यांनी उमेदवारी मागीतली व स्वतः उत्साह व आत्मविश्वास दाखवून लढायला तयारी केली त्या वेळी मात्र त्यांना उमेदवारी नाकारली असेही काही वेळा घडले आहे, १९८० च्या दशकात नंदुरबार जिल्हा निर्मिती पूर्वी कोंग्रेस चा बोलबाला जिल्हात असतांना तळोदा व अक्कलकुवा भागात भाजप संघटन टिकून होत यात नागेश पाडवी, माजी आमदार डॉ,नरेंद्र पाडवी, विद्यमान नगराध्यक्ष अजय परदेशी सुरेश गुलाल माळी, यांचा सोबत प्रतापपूर सारख्या खेड्यातुन दररोज ये जा करत भाजप संघटना टिकवून ...