Posts

Image
आदिवासी मजूरांना धान्य वितरणाचा शुभारंभ लॉकडाऊन परिस्थितीत बेरोजगार झाल्याने राज्यातून किंवा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या आदिवासी जमातीतील मजुरांना भोजनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धान्य खुल्या बाजारात न विकता आदिवासी मजुरांना वाटप करण्याचा शुभारंभ पालकमंत्री पालकमंत्री  ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. महामंडळाकडील धानाची भरडई करून पॅकिंग केल्यानंतर  धान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. भरडई होईल तसे हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. सबंधित जिल्ह्यांच्या मागणीनुसार हे धान्य देण्यात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. साभार जी, मा,का, नंदुरबार

आमलाड शिवारात बिबट ची दहशत

Image
प्रतिनिधी  तळोदा - नगरसेवक गौरव वाणी यांच्या आमलाड येथील शेत शिवारात रात्रींच्या सुमाराला बिबट्याने त्यांचा पाळीव कुत्र्याचा फडश्या पडल्याची घटना घडली. याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे...                   आमलाड शेत शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवेंद्रलाल वाणी यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला व त्यास  बहुरुपाकडे जबड्यात ओढून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.         वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करा अशी मागणी करण्यात येत आहे.
Image
कार्यआरंभ आदेश नसताना काम सुरू चॉकशी ची मागणी प्रतिनिधी तळोदा  येथील प्रभाग क्रमांक एकमधे लॉकडाऊनच्या काळात सुरु असलेल्या बेकायदेशीर कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.              याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्याचे आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा नगर पालिका हद्दीमधील प्रभाग क्रमांक एक मधिल धानकावाड़ा परिसर व शंकर पार्वतीनगरमधे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाऊन काळात देखील बेकायदेशीरपणे गटार बांधकाम करने व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे आदि कामे ही कामे सुरु आहेत. नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा कार्य आरंभ आदेश न देता सुरु करण्यात आलेली असून नगरपालिकेचे काही पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगमताने सदरील कामे सुरु असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.            या संदर्भात ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखिल लेखी तक्रार करण्यात आली असून त्याची प्रत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देखिल सादर करण्यात आली होती.मात्र,...

रमजान ची नमाज घरातच अदा करा,,,, निसार दादा मक्राणी

Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमझान ची नमाज घरातच अदा करा -निसार मक्राणी (प्रगतशील शेतकरी)  प्रतिनिधी तळोदा  :-प्रत्येक मुस्लिम बांधवांनी  रमजान  महिन्यात मशिदीमध्ये न जाता घरातच सामाजिक अंतर ठेवून नियमित नमाज अदा करावी सोबतच शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येकाने कोरोणाचा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील रहावे . असे आवाहन प्रतापपूर येथील प्रगतिशील शेतकरी निसारअली मक्राणी यांनी केले आहे.   सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून  मुस्लिम समाजातील लोकांकडून रोजा ठेवला जात आहे.रोजा सोडण्यापूर्वी मशिदीत जाऊन सामुदायिक नमाज अदा करणे हे प्रथम कर्तव्य मानले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सध्याच्या काळात मशिदीत जाऊन नमाज अदा करता येऊ शकत नाही.म्हणून प्रत्यकाने आपापल्या घरीच  नमाज अदा करावी असे आवाहन तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथिल शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी निसार मक्राणी यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे.  आधीच्या काळी देखिल मस्जिद नव्हत्या , मंदिर नव्हते पण त्याकाळी देखील रोजा ठेवला जात असे व्रत केल...

गुजरात राज्यातून ९०० मजूर परतले

Image
प्रतिनिधी तळोदा   गुजरात राज्यातील तब्बल ९०० ऊस तोडमजूर मढि जिल्हा तापी इथून काही खाजगी टेंपोने गुजरात राज्याची सीमा ओलांडून निझर मार्गे महाराष्ट्र्रात दाखल झाले असून सदर मजूर  प्रकाशा इथं पोहचणार असल्याचे जिल्हा प्रशासन ला कळल्या नंतर तात्काळ प्रशासन च्या हालचाली गतिमान झाल्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली, तसेच त्यांना  शहादा इथं न नेता सरळ तळोदा तालुक्यातील आमलाड विलगिकरण कक्ष कडे नेण्यात आले या ठिकाणी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडण्यात आले, दरवर्षी गुजरात राज्यात ऊसतोडणी साठी सह कुटुंब  हजारो मजूर नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतरित होत असतात, यंदा देखील असेच शहादा तालुक्यातील व तोरणमाळ भागातील मजूर गुजरात राज्यात गेले होते, मात्र गुजरात राज्याने त्यांना महाराष्ट्रात परत जाण्यासाठी त्यांना  गुजरात  राज्याने उन्हा तान्हात कोणतेही सोय न करता पाठविले आहे , शहादा तालुक्यातील सिंध दिगर,तोरणमाळ, कुंडी पाळा , खडकी , झापी फलाई  कुंड्या भाद्दल ,जुना व नवा तोरणमाळ या भागातील बहुसंख्य मजूर आहेत ,   गुजरात राज्यसरकार ने इतका मोठ...
Image
साहेब तू देव माहू हाय कालीचरण सुर्यवंशी तळोदा प्रतिनिधी सम्पूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे त्यात भारत आणि महाराष्ट्र देखील सुटले नाही आपल्या जिह्यातील कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात राज्यात जात असतात ह्या वर्षी देखील कामासाठी गेलेत परंतु कोरोना या महामारीने कामगारावरती महासंकट उभे केले अशात गुजरात राज्याच्या विविध ठिकाना हुन हे मजूर काही किलोमीटर तासनतास पायी चालत महाराष्ट्र सीमे लगत अंबाबारी धारणाजवळ एकत्र आले जवळपास हजार ते बाराशे मजूर अंबाबारी गावाजवळ आले असता स्थानिक लोकांनी त्यांची नास्ता व चहापाण्याची वेवस्था केली.      स्थानिक लोकांनीच शहादा तळोदा चे आमदार राजेश पाडवी यांच्याशी सम्पर्क करून सर्व माहिती दिली. आमदार राजेश पाडवी यांनी सम्पूर्ण माहिती घेऊन मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ढपंर,आयशर,पिकप अश्या गाडीची वेवस्था  स्वखर्चाने केली.      पायी चालत आलेल्या मजुरांचे पाय सुजलेले होते तर काहीच्या पायाला फोड आलेले दिसून आले महिलांन सोबत लहान मुलं देखील होते.      आमदार राजेश पाडवी यांनी सर्व माहीती ...

गुजरात राज्यातून ९०० मजूर परतले

Image
प्रतिनिधी तळोदा   गुजरात राज्यातील तब्बल ९०० ऊस तोडमजूर मढि जिल्हा तापी इथून काही खाजगी टेंपोने गुजरात राज्याची सीमा ओलांडून निझर मार्गे महाराष्ट्र्रात दाखल झाले असून सदर मजूर  प्रकाशा इथं पोहचणार असल्याचे जिल्हा प्रशासन ला कळल्या नंतर तात्काळ प्रशासन च्या हालचाली गतिमान झाल्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली, तसेच त्यांना  शहादा इथं न नेता सरळ तळोदा तालुक्यातील आमलाड विलगिकरण कक्ष कडे नेण्यात आले या ठिकाणी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडण्यात आले, दरवर्षी गुजरात राज्यात ऊसतोडणी साठी सह कुटुंब  हजारो मजूर नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतरित होत असतात, यंदा देखील असेच शहादा तालुक्यातील व तोरणमाळ भागातील मजूर गुजरात राज्यात गेले होते, मात्र गुजरात राज्याने त्यांना महाराष्ट्रात परत जाण्यासाठी त्यांना  गुजरात  राज्याने उन्हा तान्हात कोणतेही सोय न करता पाठविले आहे , शहादा तालुक्यातील सिंध दिगर,तोरणमाळ, कुंडी पाळा , खडकी , झापी फलाई  कुंड्या भाद्दल ,जुना व नवा तोरणमाळ या भागातील बहुसंख्य मजूर आहेत ,   गुजरात राज्यसरकार ने इतका मोठ...