
सत्ताधारी गटाचा अंतर्गत वादामुळे विकस कामांचे आठ कोटी परत गेले कालीचरण सूर्यवंशी✒️ तळोदा शहरातील नवीन वसाहती मध्ये रस्ते गटार विद्युत पथदिवे व मूलभूत सुविधा नसल्याने वसाहती मधील नागरिकांनी नगराध्यक्ष व आमदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे, या बाबतीत अधिक माहिती काढली असता पालिकेच्या हक्काचा निधी तब्बल आठ कोटी इतका वेळेवर खर्च करण्यास पालिकेच्या सत्ताधारी व पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने २०१८ सालीच परत गेल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून या विविध विकास कामाची प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकारी मंजुळे यांनी दिली होती या कामा बाबत रीतसर वृत्तपत्र मधून टेंडर नोटीस देखील निघाली होती, मात्र अडीच महिने या बाबतीत काम कोणाला द्यायचे या बाबतीत मतभेद मूळ निधी परत गेल्याची चर्चा आहे, पालिकेचा निधी हा नागरिकांचा सुविधा साठी असतो मात्र त्या निधीवर डोळा ठेवून टक्केवारी साठी व ठेक्यासाठी अंतर्गत वाद वाढल्याने निधी परत गेल्याचे नुकतेच जितेंद्र दुबे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केल्याने अंतर्गत राजकीय कलह चा फटका विकास कामांना बसू नये अशी अपेक्...