तालुकास्तरावर यंत्रणा उभारा! शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तळोदा :  सरकारी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची दुर्गम भागातील आदिवासीची परिस्थिती नाही. अश्यातच केवळ मान्यता प्राप्त व शासकीय रुग्णालयातील दाखल रुग्णांना रेमडीसीविअर इंजेक्शन उपलब्द होत आहे. परिणामी इतर रुग्णांना व नातेवाईकाना इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाचा जीव टांगणीला आहे.. अश्या सर्वच गरजू गरिब रुग्णांना तालुका स्तरावर रेमडीसेवीर इंजेक्शन उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्याची मागणी तळोदा राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे सयुक्तिक निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना देण्यात आले आहे..  

           या निवेदनात म्हटले आहे की,  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासकीय रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खाजगी रुग्णालये ग्रामीण भागातील गौर गरीब आदिवासी बांधवाना परवडणारे नाहीत. अश्या परिस्थितीत रेमडीसीवीर इंजेक्शन हे सरकारी कोवीड सेंटर व मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात देण्यात येत आहेत. त्यामुळे आदिवासी जनतेने जावे कुठे? अशा विवंचनेत ग्रामीण भागातील रुग्ण सापडला आहे.    
          नंदुरबार जिल्ह्यात शहादा व नंदूरबार येथेच खाजगी कोवीड रुग्णालये आहेत. नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश रुग्णांचा सिटीस्कॅन स्कोर जास्त आहे. त्यांना डाँक्टरांकडून रेमडीसेवीर इंजेक्शन घेणे बाबत  प्रिस्क्रीप्शन देण्यात येत आहे. अशावेळी रुग्ण व त्यांचा नातेवाईकाची रेमडीसेवीर इंजेक्शन शोधण्यासाठी जीव घेणे प्रयत्न सुरू आहेत. अधिकचे पैशे घेऊनही इंजेक्शन बाजारात उपलब्ध होत नाही. इंजेक्शन हवे असेल तर अगोदर बेड उपलब्ध करून घ्यावे लागेल. मात्र खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परिस्थिती नसल्याने व बेड्सही उपलब्ध होत नसल्याने अशा बिकट प्रसंगी रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे.. 
        प्रत्येक तालुक्यातील आरोग्य विभाग व तहसिलदार यांच्या अधिकाराखाली ग्रामीण भागातील रुग्णांकरीता रेमडीसेवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून ग्रामीण दुर्गम भागातील रुग्णांची फरफट थांबेल व गरजू रुग्णास तालुका स्तरावर रेमडीसेवीर उपलब्ध होईल. यासोबतच तालुक्याचा उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोवीड केंद्रांना बेड्सची क्षमता वाढवण्यात यावी जेणेकरून रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबेल..अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.. 
          या निवेदनावर माजी आ. उदेसिंग पाडवी, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष निखिलकुमार तुरखिया, नगरसेविका अनिता परदेशी, प्रतिक्षा ठाकूर, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, शिवसेनेचे तळोदा तालुकाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांत भोई, तळोदा शिवसेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे, जेष्ठ शिवसैनिक संजय पटेल, जेष्ठ शिवसैनिक गौतमचंद जैन, संदिप परदेशी, तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डाँ.लक्ष्मीकांत गिरणार, तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.जगदीश मराठे, भरत चौधरी, योगेश मराठे, कमलेश पाडवी, शेख अदिल शेख दिलावर, धर्मराज पवार, इम्रान बुधा शिकलीकर, जयेश जोहरी आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत....

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी