शिवभोजन घेणाऱ्या 75 निराधारांचे RAT निगिटिव्ह
तळोदा : शहरातील मध्यवर्ती भागात शिवभोजन केंद्र येथे 53 निराधार व गरजू लोकं जे जेवणासाठी येतात त्यांना कोरोना बाबत समुदेशन व रोगाची गंभीरता बाबत महत्त्व पटवून दिल्यानंतर त्याया नीनीनीनीनंनंस्वखुशीने रॅपिड Antigen टेस्ट करून घेतली.
कोरोनाचा प्रादुर्भाव व परिस्थिती गंभीर असताना ज्या निराधाराना जेवणाची देखील शाश्वती नाही अश्या 75 लाभार्थ्यांना अगदी हसत खेळत कोणी फिल्मी स्टाईलने गाणे गात, कलाकारची नकला करत तपासणी करून घेतली.. त्यांच्या या सकारात्मक ऊर्जेने आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील अवाक झाले. विशेष म्हणजे या सर्वच लाभार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. डॉ.महेंद्र चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची चाचणी करून घेतली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ.तुषार पटेल, जगदीश नाईक, आरोग्य सेवक, प्रकाश चौधरी,आरोग्य सहायक, सी.जी.बोरसे, आरोग्य सेवक, सुनील गोजरे,नगरपालिका कर्मचारी आदी उपस्थित होते. या गरजुना भयावह कोरोनापेक्षा 2 वेळेचे जेवण मिळणे गरजेचे आहे. अश्यातच त्यांनी ज्या सकारात्मक पद्धतीने कोरोना चाचणी केली ती खरच कौतुकास्पद असल्याचे डॉ.महेंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. नागरिकांना शासनाने आखून दिलेले नियम काटेकोरपणे पालन केल्यास नकीच कोरोनावर मात करू असा विश्वास दर्शवला..
Comments
Post a Comment