कोविड काळात सेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारीकांना आवाहन


नंदुराबर दि.22- कोविड काळात जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, अलगीकरण कक्ष आणि कोविड रुग्णालयात सेवा देण्यासाठी इच्छुक कंत्राटी डॉक्टर, फिजीशिअन, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ही पदभरती 3 महिन्यासाठी असून ती रद्द करणे अथवा स्थगित करण्याचे अधिकारी समितीला असतील. त्याबाबत कोणालाही दावा करता येणार नाही. इच्छुकांनी आवश्यक मुळ कागदपत्रे आणि त्याच्या छायांकित प्रतीचा एक संच घेऊन सोमवारी समक्ष भेटावे. जिल्हा रुग्णालय येथे पुरेसे उमेदवार उपलब्ध होईपर्यंत थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.

भिषक (फिजीशियन) साठी एमडी मेडीसीन पात्रतेसह नोंदणी प्रमाणपत्र असावे. भुलतज्ञ पदासाठी पदवी किंवा पदविका आणि नोंदणी प्रमाणपत्र असावे. या दोन्ही पदासाठी  त्यासाठी दरमाह 75 हजार रुपये मानधन आणि कोविड-19 सेवा दिल्याबद्दल 1.25 लाख असे अधिकाधिक 2 लाख रुपये देण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस किंवा उमेदवार न उपलब्ध झाल्यास बीएएमएस उमेदवारांना संधी देण्यात येईल. एमबीबीएस उमेदवारास 60 हजार व बीएएमएस उमेदवारास 30 हजार रुपये दरमाह मानधन व देय भत्ते देण्यात येईल. स्टाफ नर्स पदासाठी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग आणि नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी दरमाह 20 हजार रुपये मानधन देण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी कळविले आहे.
---

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?