शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...! कालीचरण सूर्यवंशी तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघात विद्यमान आमदार राजेश पाडवी तर काँगेस कडून राजेंद्र गावित अशी सरळ लढत असल्याने काट्याची टक्कर समजली जात आहे. मात्र मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीचां अनुभव पाहता तिरंगी तसेच अपक्ष अशी झालेली आहे त्यामुळं कोण किती आणि कोणत्या उमेदवाराचे मत घेतात यावर निकाल ठरत होता मात्र मात्र यंदा एक अपक्ष वगळता हि लढत सरळ झालेली आहे. त्यामुळं निकालाचा दिवशी काय निकाल येतो या कडे उत्सुकता वाढली आहे . विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ झालेले मतदान एकूण पुरुष मतदार -१७५०४३ एकूण स्त्री मतदार - १७७५८८ एकूण इतर मतदार -५ एकूण मतदार -३५२६३६ झालेले मतदान पुरुष मतदार - १२१९५१ स्त्री मतदार - १२१४०८ इतर मतदार - ३ एकूण एकंदर झालेले मतदान २४३३६२ - (६९.0१%) लोकसभेत काँगेस आघाडीवर - २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप चां डॉ हिना गावित या शहादा तळोदा मतदार संघात ...