भाजप नवीन फळी उभी करणार?
कालीचरण सूर्यवंशी✒️
तळोदा भाजप मधील अंतर्गत कलह सत्तास्थापने पासून सुरू असून दरम्यान मागील काळात तळोदा पालिकेचा सत्ताधारी भाजप गटा मधील अंतर्गत कलह तसेच माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत बगीचा लोकार्पण कार्यक्रमात एक दोन वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे पक्ष पातळीवर याची दखल जिल्हा नेतृत्वाने घेतली असुन या बाबतीत नगराध्यक्ष व नगरसेवकांना जाब विचारण्यात आले होते. त्यामुळे तळोदा शहरात भाजप मधील प्रस्थापित राजकीय व्यक्तींना नवीन पर्याय येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजप शोधत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून या बाबतीत कोणतं बड वलय असलेल नेतृत्व माजी नगराध्यक्ष भरत माळी भाजपा मध्ये कसे येतील या करिता जोरदार प्रयत्न पक्ष पातळीवर सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे, एकंदरीत येणाऱ्या काळात आता घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत , दरम्यान काँग्रेस च्या एका जेष्ठ पदाधिकारी च्या म्हणण्यानुसार आमचे नेते भरत माळी यांना भाजप
कडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे त हे सत्य आहे मात्र भरत भाई माळी काँग्रेस सोडणार नाहीत.तळोदा नगर पालिकेच्या माध्यमातून प्रवेशद्वार उद्घाटन कार्यक्रम खासदार डॉ हिना गावीत यांच्या हस्ते आयोजित केल्याने आमदार राजेश पाडवी यांनी कार्यक्रमात पाठ फिरवली असल्याची चर्चा असून आता भाजप शहरात नवीन संघटन व येणाऱ्या पालिका निवडणुकी साठी वेगळी फळी शोधणार असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.
त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजप मधील नगराध्यक्ष व काही नगरसेवक काय भूमिका घेतात या कडे लक्ष लागून आहे.त्याची झलक आज माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला या वेळी आमदार राजेश पाडवी प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी तसेच उपनगराध्यक्ष सौ भाग्यश्री योगेश चौधरी तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी,जिल्हा चिटणीस ,हेमलाल मगरे राजेश राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण ठाकरे, विलास डामरे ,युवा मोर्चा चे उपाध्यक्ष शिरीष माळी, विठलं बागले,प्रवीण वळवी ,मंगेश पाटिल रसिला बेन देसाई अमी तुरखीया, शोभना देसाई भारती कलाल, लिंनाबेन मेहता डॉ महेंद्र चव्हाण वैद्यकीय अधिकारी डॉ आपसिंग पाडवी आमदार स्वीय सहायक किरण सुर्यवंशी उपस्थित होते
नगरसेवक अनुपस्थित चर्चेचा विषय -
दरम्यान आजचा फळ वाटप कार्यक्रमात रुग्णालयात पालिकेचे नगरसेवक गैरहजर होते , या बाबत अधिक माहिती घेतली असता काहींना आमंत्रणच दिल नसल्याच समजते यात भाजप मधील अंतर्गत कलह आता व्यक्तिगत न राहता भाजपचे लोकप्रतिनिधी मध्ये वैचारिक मतभेत व अविश्वास प्रचंड वाढलेला दिसून येतो त्याचा परिणाम संघटन पातळीवर होतांना दिसत असून यात भाजप खासदार आमदार यांच्यात राजकीय तणाव तर तळोदा नगराध्यक्ष व आमदार यांच्या मधील संबध ताणले गेले असून यात आता नगरसेवक काहीसे अडचणीत सापडले आहेत त्या मूळ आता येणाऱ्या नेमकी कोणती भूमिका घेतात या कडे लक्ष लागून आहे, अगोदर पालिकेत सत्ताधारी गटात अंतर्गत मतभेत उघड होते आता मात्र ड्राल सरळ दोन गट पडतांना दिसत आहेत मात्र निवडणुकीत तिकीट कोना कोणाला दिल जाईल ? गट कोण स्थापन करेल ? राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कोण जाईल ?
तर फक्ट चर्चा वाढवून आहे त्याच ठिकाणी कोण राहील याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
सुंदर व अभ्यासपूर्ण बातमी
ReplyDelete