स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या तळोदा भेटीला ८१ वर्ष पूर्ण
- Get link
- X
- Other Apps
सावरकरांच्या तळोदा भेटीला ८१ वर्ष पुर्ण
गुजरात आणि मध्य प्रदेश चा सीमेलगत असणाऱ्या तळोदा परिसर जरी भोंगलीक दृष्टीकोनातून महाराष्ट्र चा उत्तर भागातील गाव असलं तरी शिवाजी महाराज व अहिल्याबाई होळकर यांचा पासून ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे इंग्रजांचा जोखडातून देशाला स्वतंत्र करण्यासाठी एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारतात भेटी देवून निधी गोळा करीत स्वातंत्रयसमर अधिक चेतविला. त्याच अभियानाअंतर्गत दि.१३ मार्च १९४० रोजी त्यांनी तळोदा शहराला भेट दिली. आज १३ मार्च २०२१ रोजी त्या भेटीला ८१ वर्ष पुर्ण होत आहेत. तळोदा तालुक्यासह शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तळोदयाला अनेक स्वातंत्रवीरानी
भेटी दिल्या आहेत. त्यात दि.१३ मार्च १९४० रोजी स्वातंत्रवीर वि.दा.सावरकरांचा तळोदा शहरातील इतिहास प्रसिद्ध् बारगळाच्या गढ़ीत दिलेल्या भेटीला आज ८१ वर्ष पूर्ण होत आहेत. सावरकरांच्या तळोदा गढ़ीत भव्य सत्कार करण्यात आला होता. येथील सामाजिक कार्यकर्ते अमरजीत बारगळ यांचे आजोबा
जहागीरदार शंकरराव् बारगळ यांनी सावरकरांना मानपत्र देवून त्यांचा सत्कार केला होता. १३ मार्च १९४० रोजी दुपारी दोन वाजता बारगळाच्या गढ़ीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यांचा सत्कार करुण त्यांचा कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. गावकऱ्यातर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांची देशप्रेमाने भरलेली अमृतवाणी ऐकण्यासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याचे धगधगते अग्निकुंड चेतविण्याचे, देशप्रेमाचे मंतरलेले ते दिवस होते. अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेतले.आजही या दिवसाच महत्व समजून या सुवर्ण आठवणी ना उजाळा देण्यासाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ कडून स्मृतींना उजाळा देण्यासाठी बारगळ गढी ला भेट दिली जाते ,व प्रतिमा पूजन करून आठवणी ना उजाळा दिला जातो यंदा कोरोना मूळ रद्द करण्यात आ ले वि.दा. सावरकरांच्या तलोद्यातील इतिहासाची साक्ष् देणारी बारगढ़ गढ़ीच्या भेटीला ८१ वर्ष पूर्ण होत आहेत तळोदा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्व झोकूनदेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारत भेटीत तळोद्यात दि.१३ मार्च १९४० रोजी भेट दिली होती. त्या भेटीला १३ मार्च २०२० रोजी ८० वर्ष पूर्ण होत आहेत
टोपी आठवणी जपून -
या ऐतिहासिक स्थळा च्या बारगळ वंशज यांनी आठवणी जपून ठेवल्या असून त्यात स्वातंत्र्य वीर सावरकर येणार या बाबत पत्रक वाटण्यात आले होते तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी बारगळ कुटुंबाला त्यांची स्वतः ची टोपी दिली होती ती देखील अजूनही जपून ठेवली आहे
कालीचरण सूर्यवंशी
- Get link
- X
- Other Apps
Savarkar's goodwill visit to Gadi is a matter of pride for our house and village. Your news and writing is excellent.
ReplyDeleteBargal anjali.