पप्पा चरण स्पर्श.........
कालीचरण सुर्यवंशी/तळोदा
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी तसेच माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्यात असणारे असलेले राजकीय मतभेद हे सर्वश्रुत आहेत दरम्यान नुकताच झालेल्या एका साखरपुड्याच्या खाजगी कार्यक्रमात दोघ दिग्गज आमंत्रित होते या ठिकाणी उपस्थिती असताना आमदार राजेश पाडवी यांनी उदयसिंग पाडवी यांना वाकून नमस्कार केल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू होती साहेब आणि दादांमधील वितूष्ट मिटले,असा कयास यामुळे लावण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की,तळोदा-शहादा मतदारसंघांमध्ये मागील काळात माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी पाच वर्ष भरपूर निधी आणून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते दरम्यान मागील विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळेल असा अंदाज असताना वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या राजकीय घडामोडी तसेच स्थानिक राजकीय घडामोडी या कारणांमुळे उदेसिंग पाडवी यांचे तिकीट त्यांना न देता त्यांचे सुपुत्र मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांना दिले गेले तिकीट दिल्यानंतर माजी आमदार उदेसिंग पाडवी व राजेश पाडवी यांच्यातील अंतर्गत राजकीय तणाव अधिकच वाढले तिकीट नाही मिळाल्याने उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून थेट डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेस कडून उमेदवारी केली व लक्षनिय मतं मिळवली त्यांच्या पराभव जरी झाला असला तरी त्यांना मिळालेली मते ही लक्षणे होती दरम्यान तिकीट कापले गेल्याने आमदार उदयसिंग पाडवी प्रचंड नाराज होते त्यावेळी त्यांनी स्थानिक भाजपच्या लोकांपासून तर पक्षश्रेष्ठीपर्यंत त्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली दरम्यान तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा असो किंवा विविध सर्वाजिंक कार्यक्रमात एकमेकांचा समोर एकच व्यासपीठवर टाळले वेळोवेळी जाहीर कार्यक्रमात व राष्ट्रवादी काँग्रेस चा जाहीर कार्यक्रमात विधानसभेची उमेदवारी मीच करेल राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार विजय असेल तसेच वेळोवेळी त्यांनी प्रहार केलेले दिसून येतात अनेक कार्यक्रमांमध्ये शहर व तालुक्यात पिता पुत्र एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळत असत दरम्यान शहर तालुक्याच्या विकासासाठी पिता-पुत्रांनी एकत्र यावे म्हणून अनेक हितचिंतकांचे प्रयत्न जोरात सुरू आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीच्या पूर्वी तळोदा शहरातील सर्व दिग्गज नेते सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यात एकच चर्चा होती की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार राजेश पाडवी यांच्यासमोर उदयसिंग पाडवी यांची भूमिका काय असेल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मी लढवेल अशी भूमिका राजेश पाडवी यांनी घेतली होती त्यामुळे काहीसे तणावाची स्थिती शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती मात्र माजी सभापती उदयसिंग पाडवी यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने निवडणुकीत काय होईल याचा अंदाज सर्वांनाच आला होता
मागील काळामध्ये विविध कार्यक्रमात किंवा राजकीय मुद्द्यावर पिता-पुत्रांच्या राजकीय तणाव दिसून आला होता त्यातूनच तळोदा येथील एका खाजगी कार्यक्रमांमध्ये आमदार राजेश पाडवी यांना वाकून नमस्कार केल्याने त्याची चर्चा कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित होते.
आय लव पपा.....
आमदार राजेश पाडवी आमदार होण्यापूर्वी पासून त्यांचा मोबाईल स्टेटस आय लव यू पपा असे होते दरम्यान त्यांचे वडील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा ऐवजी राजेश पाडवी यांना तिकीट देण्यात आले.तेव्हा पासून जिल्हा मधील व स्थानिक भाजप पदाधिकारी नेते तसेच आमदार राजेश पाडवी व उदेसिंग पाडवी यांच्यात दुरावा निर्माण झाला.तळोदा पालिकेचा सर्व साधारण सभा या दोन पिता पुत्र मधील राजकीय तणाव मुळे सभा रद्द झाली होती तसेच अत्यंत तणावात झालेली विषय समिती निवड असो . राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवकांचा उद्यान उद्घाटन प्रसंगी नगर अध्यक्ष बहुतांश नगरसेवक माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रममुळे आमदार राजेश पाडवी शहरात बी टीम तयार करण्याचा तयारीत होते .
दरम्यान,जाहीर रित्या पालिकेवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकेल आम्ही आमची राजकीय ताकद दाखवून देवू असे आवाहन देणारे जाहीर व्यक्तव केलीत. दरम्यानचा काळात विविध जाहीर कार्यक्रम मध्ये एकाच व्यासपीठावर येणे टाळले अपवाद पत्रकार संघाचे दोन कार्यक्रम ठरले. इतके तणाव असताना देखील आमदार राजेश पाडवी यांनी आय लव यू पपा हे स्टेटस काढले नाही यातून पिता बद्दल पुत्रला असलेला सन्मान विसरले नाहीत हे दिसून येते
भाजपची गोची -
माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात पालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विजयी झाल्यामुळे उदेसिंग पाडवी यांच्या बद्दल आदर व भीती सर्वांचं नगर अध्यक्ष वर नगरसेवकांना होती .त्या मूळ एकूणच शहरातील भाजप गट चिंतेत होता. मात्र आमदार राजेश पाडवी यांनी मोठे मन करत त्यांचे पिता उदेसिंग पाडवी यांचे चरण स्पर्श केल्यामुळे सकारात्मक संकेत सर्वांना मिळाले त्याचा परिपाक कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी पिता पुत्रांनी राखलेला सयंम व समन्वय या मूळ पिता पुत्र मधील संघर्ष कुठ तरी मिटत असल्याचे चित्र दिसते
छान चरणस्पर्श सरजी....
ReplyDelete