तळोदा नगर पालिका चार वर्षे सत्तेची

कालीचरण सूर्यवंशी ✒️



तळोदा नगर पालिकेचा सत्ताधारी गटाला अर्थात नगराध्यक्ष अजय परदेशी  व त्यांचा सोबत असणाऱ्या भाजप नगरसेवकांना माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात निवडुन आज चार वर्षे पूर्ण झाले असून तळोदा पालिका निवडणुकी पुर्वी जाहीर करण्यात आलेल्या वचननामा पैकी काही काम अजूनही अपूर्णच असून पैकी काही विषयाला तर अजून हात देखील घातलेला नाही ,
        तळोदा पालिकेत भाजपची सत्ता असून त्यांचा वचननामा मधील काही  ठळक मुद्यापैकी तळोदा  शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्या बाबत त्यांनी वचन दिले होते ते अजूनही अपूर्णच असून हक्काचे महाराष्ट्रचे हक्काचे  तापी मधील पाणी मिळण्यासाठी  राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असताना देखील  जलसंपदा संबधित मंत्री लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्न तोडके दिसून येतात,
तसेच मोकाट गुरा साठी बंदोबस्त करण्यासाठी कटीबद्ध असणार असे देखील वचन नाम्यात होते मात्र आजही हा प्रश्न तसाच आहे,

जनता दरबार कधी भरलाच नाही- 
वचन नाम्यात दर  महिन्याला जनता दरबार भरवून लोकांचा समस्या समजून घेणार असा वचन नामा होता मात्र एकदाही जनता दरबार भरला नाही त्या मुळे कुठंतरी सत्ताधारीना वचन नाम्याचा विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो

तसेच स्वच्छ सुंदर शहर बाबत सुरवातीला स्वतः नगराध्यक्ष यांनी लक्ष घालून प्रयत्न  झालेत  मात्र नंतर ठेकेदार व पालिका प्रशासन व सत्ताधारीचा वचक नसल्याने यंत्रणा कमी असल्याने ताण अधिकच वाढला आहे,

नाना नानी पार्क -
प्रत्येक प्रभागात खुल्या जागेत नाना नानी पार्क तयार करण्यात येणार होते मात्र सद्य स्थितीत तसे प्रयत्न दिसून येत नाही

खुल्या जागेचे निवडक ठिकाणी रूप बदलले -
तळोदा शहरात नवीन वसाहती मध्ये विमलनगर मध्ये जेष्ठ नागरिक संघ साठी प्रशस्त सभागृह तयार करण्यात आले आहे तसेच साई बाबा नगर मध्ये देखील असेच प्रकारे प्रशस्त सभागृह तयार करण्यात आले आहे, तर भगवान सीताराम नगर मध्ये आदिवासी संस्कृती भवन तयार करण्यात आले असून याच नागरिकांना निश्चितच कार्यक्रम साठी सोय झाली आहे,

व्यापारी संकुल धूळखात - पालिकेचा मालिकेचे करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले संकुल धूळखात पडले असून या व्यपारी संकुलाच नेमकं घोड कुठं आडले आहे हा शोधाचा विषय आहे,

विकास कामांना गती - दरम्यान तळोदा शहरात शहादा रस्ता , चिनोदा रस्ता, नंदुरबार रस्ता रुंदीकरण व दुभाजक टाकून शहरात कधी नव्हे ते ठोस काम झाले असून पैकी शहादा व नंदूरबार रस्त्याला प्रवेशद्वार मुळे शहर कूठतरी बदलत आहे हे दिसून येते, तसेच  ठीक ठिकाणी खुल्या व्यायाम शाळा या  नागरीक साठी आकर्षक ठरत आहेत

अंतविधी लाकूड मुक्त उपलब्ध केल्याने या बाबतीत गोर गरिबांची अडचण दूर झाली आहे,

वळण रस्ता भिजत घोंगडे-  हातोडा पूल मूळ शहरात अवजड वाहतूक वाढली असून त्याला वळविण्यासाठी वळण रस्ता नसल्याने नियमित वाहतूक कोंडी होते,
मात्र त्या बाबतीत पालिका अजूनही ठोस उपाय करण्यास असफल ठरली आहे,

राजकिय अतिक्रमणे कधी  निघणार ?
शहरात प्रमुख बाजारपेठ व  ठीक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सर्वच राजकीय पक्षांनी अतिक्रमण पक्के कच्चे करून ठेवले असून ते दिवसेंदिवस वाढतच जात असून राजकीय पक्षची जणूकाही स्पर्धा लागली असून कोणीच या बाबतीत जाब विचारत नसून त्या मुळे सत्ताधारी ची पालिका प्रशासन ची इच्छाशक्ती दिसत नाही

सत्ताधारी गटात अंतर्गत कलह -
दरम्यान चार वर्षात शहरात चारही बाजूला रस्त्याचा माध्यमातून विकास झाला असला तरी
भाजप मधील नगराध्यक्ष व नगरसेवकांचे चारही दिशेला चार तोंड दिसून येतात  वेळोवेळी अंतर्गत कलह उभाळून येतो मागील चार वर्षात काँग्रेस च्या तुलनेत भाजप मधूनच अधिक विरोध दिसून आला आहे,

पालिका नवीन जागेत स्थलांतरित - पालिका गेल्या वर्षी नवीन जागेत स्थलांतर झाली असून पालिकेत सर्व विभागाला प्रशस्त अस कार्यालय उपलब्ध आहे,

मागील चार वर्षात अनेक राजकीय घडामोडी तळोदा पालिकेत झाल्या असून त्यात मुख्य राजकीय घडामोड म्हणजे सत्ताधारी भाजपला सत्तेत बसविणारे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्ष कडुन तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला व नंदुरबार मतदारसंघात उमेदवारी केली आता मागील काळात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून एकनाथ खडसे यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधील अतिशय मानाचे पद अर्थात प्रदेस उपाध्यक्षपदी निवड झाली असून
मागील तीन वर्षे पासून पालिकेत सत्ताधारी गटात अंतर्गत विरोध अधिकच वाढला असल्याने तसेच स्वीकृत नगरसेवक पद दरवर्षी फिरते राहील असे निवडणुकी नंतर जाहीर करण्यात आले होते, त्या मुळे देखील वाद सतत  गाजत राहिले, प्रभागात कामे होत नाहीत म्हणून  सत्ताधारी भाजप मधीलच उपनगरअध्यक्ष यांना उपोषण करावे लागले,
 त्या मुळे भाजप मधील अंतर्गत कलह हा वेळोवेळी समोर आलेला दिसून येतो,

येणारे वर्ष निवेदन उपोषण आंदोलन व मोर्चाचे -
मागील  काही निबंडणुकीचा अनुभव पाहता निवडणुकीच्या एक वर्ष अथवा सहा महिन्याअगोदर विविध प्रभागात इच्छुक तसेच विरोधीपक्ष कडुन निवेदन मोर्चा, उपोषण, जिल्हाधिकारी कडे निवेदन, हंडा मोर्चा, कचरा आंदोलन, ठिय्या आंदोलन सुरू होतात अर्थात तो राजकारणचा एक भाग असून आपल्या कडे लक्ष वेधण्यासाठी असे दर निवडणुकी पूर्वी होतच असते चार वर्षांपासून ज्या मुख्य विषयांना हात घालुन प्रश्न सोडविला पाहिजे असे विषय शेवटचा काही महिन्यात एन निवडणुकीत पुढे येत असतात त्या मुळे येणारे वर्ष हे आंदोलन मोर्चा अर्थात पालिका सत्ताधारी गटासाठी कसोटीची असतील त्यामुळे अपूर्ण कामे पुर्ण करणे विरोधकांना सामोरे जाणे निवडणुकीची पूर्व तयारी करणे पक्ष  बदलून दुसऱ्या पक्षात जाणारे स्वकीय अश्या अनेक संकट येणाऱ्या काळात उभे ठाकले आहेत,
त्या मुळे आता पुढील वर्षी २०२२ निश्चितच तळोदा शहरातील राजकारण तापणार हे निश्चित

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?