Posts

Showing posts from April, 2021

तळोदा येथे कोविड लसीकरणाबाबत आढावा बैठक

Image
तळोदा: येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी  उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण बावा,  तहसीलदार गिरीश वखारे, सहा गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे, मुख्याधिकारी अनंत जवादवार आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील एकूण लसीकरण केंद्रे, केंद्रनिहाय लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची संख्या आणि मनुष्यबळाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी, जनतेचा प्रतिसाद याबाबत माहिती घेण्यात आली.  प्रत्येक लसीकरण केंद्र निहाय आराखडा तयार करण्यात यावा.  नगरपलिका क्षेत्रात लसीकरणासाठी वॉर्डनिहाय नियोजन करून त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. तलाठी,ग्रामसेवक,शिक्षक, आ रोग्य कर्मचारी,पोलीस पाटील  यांनी एकत्रितरित्या गावागावात जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे , अशा सूचना श्री.पाटील यांनी केल्या. बैठकीस शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी,...

तालुकास्तरावर यंत्रणा उभारा! शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Image
तळोदा :  सरकारी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची दुर्गम भागातील आदिवासीची परिस्थिती नाही. अश्यातच केवळ मान्यता प्राप्त व शासकीय रुग्णालयातील दाखल रुग्णांना रेमडीसीविअर इंजेक्शन उपलब्द होत आहे. परिणामी इतर रुग्णांना व नातेवाईकाना इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाचा जीव टांगणीला आहे.. अश्या सर्वच गरजू गरिब रुग्णांना तालुका स्तरावर रेमडीसेवीर इंजेक्शन उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्याची मागणी तळोदा राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे सयुक्तिक निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना देण्यात आले आहे..              या निवेदनात म्हटले आहे की,  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासकीय रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खाजगी रुग्णालये ग्रामीण भागातील गौर गरीब आदिवासी बांधवाना परवडणारे नाहीत. अश्या परिस्थितीत रेमडीसीवीर इंजेक्शन हे सरकारी कोवीड सेंटर व मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात देण्यात येत आहेत. त्यामुळे आदिवासी जन...

कोविड काळात सेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारीकांना आवाहन

Image
नंदुराबर दि.22- कोविड काळात जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, अलगीकरण कक्ष आणि कोविड रुग्णालयात सेवा देण्यासाठी इच्छुक कंत्राटी डॉक्टर, फिजीशिअन, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही पदभरती 3 महिन्यासाठी असून ती रद्द करणे अथवा स्थगित करण्याचे अधिकारी समितीला असतील. त्याबाबत कोणालाही दावा करता येणार नाही. इच्छुकांनी आवश्यक मुळ कागदपत्रे आणि त्याच्या छायांकित प्रतीचा एक संच घेऊन सोमवारी समक्ष भेटावे. जिल्हा रुग्णालय येथे पुरेसे उमेदवार उपलब्ध होईपर्यंत थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. भिषक (फिजीशियन) साठी एमडी मेडीसीन पात्रतेसह नोंदणी प्रमाणपत्र असावे. भुलतज्ञ पदासाठी पदवी किंवा पदविका आणि नोंदणी प्रमाणपत्र असावे. या दोन्ही पदासाठी  त्यासाठी दरमाह 75 हजार रुपये मानधन आणि कोविड-19 सेवा दिल्याबद्दल 1.25 लाख असे अधिकाधिक 2 लाख रुपये देण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस किंवा उमेदवार न उपलब्ध झाल्यास बीएएमएस उमेदवारांना संधी देण्यात येईल. एमबीबीएस उमेदवारास 60 ह...

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग* *एक लाख लसींच्या मात्रेचा टप्पा पूर्ण

Image
नंदुराबर दि.22- कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून नागरिकांना लसीच्या एक लाख (डोस) मात्रा देण्यात आल्या आहेत.  एकूण 11 हजार 738 आरोग्य कर्मचाऱ्यांना  पहिली मात्रा तर 6 हजार 703 कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. कोरोना योद्ध्यापैकी 14 हजार 327 व्यक्तींना पहिली तर 6 हजार 316 व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली.  45 ते 60 वयोगटातील व्यक्तींपैकी  25 हजार 37 व्यक्तींना पहिली तर 3 हजार 355 ना दुसरी , तर 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या 28 हजार 284 ज्येष्ठ नागरिकांना पहिली आणि 5 हजार 272 ज्येष्ठ नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.  एकूण 79 हजार 386 व्यक्तींना लसींची पहिली मात्रा तर 21 हजार 646 व्यक्तींना दुसरी मात्रा  अशा एकूण 1 लाख 1 हजार 32 चा टप्पा या लसीकरण मोहिमेने पुर्ण केला आहे. 14 हजार 372 मात्रा कोवॅक्सीनच्या तर 86 हजार 660 मात्रा केाविशिल्डच्या देण्यात आल्या. लसींच्या 54 हजार 818 मात्रा पुरुषांना तर 46 हजार 214 मात्रा महिलांना देण्यात आल्या. ग्रामीण भागात तसेच अधिक कोरोना बाधित आढळणाऱ...

दुर्गम भागातील लसीकरण मोहिमेला गती द्या-डॉ.राजेंद्र भारुड

Image
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 :  जिल्ह्यातील दुर्गम भागासह नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील लसीकरण मोहिमेला गती  देण्यात यावी, त्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर,  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके  आदी उपस्थित होते.  डॉ.भारुड म्हणाले, प्रत्येक तालुक्यासाठी दोन पथके तयार करून त्यांच्यामार्फत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी गावातील  लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने अधिकाधिक नागरिकाचे लसीकरण होईल याचे नियोजन करावे. 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात होणार...

लसीकरण सप्ताह राबविण्यासंदर्भात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांचे जिल्हाधिकारी य‍ांना निवेदन

Image
तळोदा शहरातील ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन कोरोना आटोक्यात आणता येईल यासाठी नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी य‍ांना निवेदन देऊन लसीकरण वाढवण्यासाठी मागणी केली आहे विशेष म्हणजे शासकीय आरोग्य पथक व लस उपलब्ध करून दिल्यास त्या पथकाला लागेल ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

संचारबंदी कालावधीत नव्याने कडक निर्बंध**जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

Image
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संचारबंदी कालावधीत नव्याने कडक निर्बंध  लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्बंध संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील. *अ) कार्यालयीन उपस्थिती-* सर्व सरकारी कार्यालये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील) कोविड-19 व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवावगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.  सरकारी कार्यालयासंदर्भात विभागप्रमुख  अधिक उपस्थितीबद्दलचा निर्णय संबंधित घटना व्यवस्थापकाच्या परवानगीने घेऊ शकतील. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 13 एप्रिल 2021 ला दिलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार इतर सर्व कार्यालयांमधे केवळ 15 टक्के कर्मचारी उपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे  अधिक असेल त्यात कामकाज करण्यास अनुमती असेल. सर्व जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्...

शिवभोजन घेणाऱ्या 75 निराधारांचे RAT निगिटिव्ह

Image
तळोदा : शहरातील मध्यवर्ती भागात शिवभोजन केंद्र येथे 53 निराधार व गरजू लोकं जे जेवणासाठी येतात त्यांना कोरोना बाबत समुदेशन व रोगाची गंभीरता बाबत महत्त्व पटवून दिल्यानंतर त्याया नीनीनीनीनंनंस्वखुशीने  रॅपिड  Antigen टेस्ट करून घेतली.             कोरोनाचा प्रादुर्भाव व परिस्थिती गंभीर असताना ज्या निराधाराना जेवणाची देखील शाश्वती नाही अश्या 75 लाभार्थ्यांना अगदी हसत खेळत कोणी फिल्मी स्टाईलने गाणे गात, कलाकारची नकला करत तपासणी करून घेतली.. त्यांच्या या सकारात्मक ऊर्जेने आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील अवाक झाले. विशेष म्हणजे या सर्वच लाभार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. डॉ.महेंद्र चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची चाचणी करून घेतली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ.तुषार पटेल, जगदीश नाईक, आरोग्य सेवक, प्रकाश चौधरी,आरोग्य सहायक, सी.जी.बोरसे, आरोग्य सेवक, सुनील गोजरे,नगरपालिका कर्मचारी आदी  उपस्थित होते. या गरजुना भयावह कोरोनापेक्षा 2 वेळेचे जेवण मिळणे गरजेचे आहे. अश्यातच त्यांनी ज्या सकारात्मक पद्धतीने कोरोना चाचणी केली ती खरच कौतुकास्पद असल्...