नेहमी टीकेचे धनी ठरणारे आरोग्य विभाग ठरतय देवदूत तळोदा:- नेहमी टीकेचे धनी ठरलेले तळोदा उपजिल्हा रुग्णालय हेच आता अहोरात्र रुग्णसेवेत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी घराबाहेर न पडण्याचा सूचना असतानाही डॉक्टर मंडळी सेवेसाठी सतर्क आहेत. रात्रंदिवस धावपळ करत 24 तास सेवा पुरवीत आहेत. कठीण परिस्थितीत आम्ही काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाच्या भीतीपोटी एकीकडे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी बंद पुकारल्यानंतर येथे जाणारे रुग्ण सरकारी दवाखाण्याकडे धाव घेत आहेत. परिणामी तुटपुंज्या मनुष्यबळ असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. संसर्गजन्य भागातून शहरात 200 पेक्षा अधिक जण दाखल झालेले आहेत. त्यांना होम कोरोटाईन केले आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व प्रशासनाची आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पूर्व नियोजन म्हणून आमलाड येथे 200 खाटांचे विलगीकरणं कक्...