शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली.
प्रतिनिधी तळोदा :--(किरण पाटील) विकासकामांना चालना मिळावी आणि त्यातून शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शहराच्या विविध मूलभूत सुविधा आणि विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तळोदा नगरपालिकेला विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) तळोद्यात घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. या पार्श्वभूमीवर तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेत शहरातील विकास कामांसंदर्भात चर्चा केली. यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती दिली. तसेच तळोदा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आधुनिक सोयीसुविधांची गरज असल्याचे त्यांनी याव...