तळोदा पालिकेच्या व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीच्या सामना

प्रतिनिधी तळोदा तळोदा पालिकेचा धूळखात पडलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याचां लिलाव झाला लाखो रुपये मोजून व्यापारी गाळे लोकांनी खरेदी केले मात्र त्यांचा आस्थापना साठी कोणतेही पार्किंग पालिकेने दिलेली नाही. तर व्यापारी गाळे दिले असले तरी त्यांचा बाजूला असणारे पालिकेचा दवाखाना अर्धवट बांधकाम चां असलेल्या ठिकाणी असणारे काही अतिक्रमण काढण्यात आले मात्र त्याची कोणतेही स्वच्छता न ठेवली गेल्याने शहरात एक नवीन कचरा डेपो तयार झाल्याचे चित्र असून या परिसरात पोलीस निवास स्थाने मच्छी बाजार तसेच इतर व्यवसायिक व निवास स्थाने धान्य बाजार आहे शहरातील मध्यवर्ती जागेवर असणाऱ्या पालिकेचा मालकीच्या जागेवर असून नगर पालिका कार्यालय ला लागून असणाऱ्या ठिकाणी अतिशय घाण पसरली असून या भागात घाणीचा चिखल तसेच दुर्गंधी पसरली असून वराह ची अतिशय आवडती जागा झालेली आहे. याचा फटका परिसरातील व्यवसायिकांना बसत आहे तसेच लाखो रुपये ची लिलावात बोली लावून देखील गाळे धारकांना किमान स्वच्छता देखील उपलब्ध होत नसल्याने प्रचंड नाराजी गाळे मालकांचा मध्ये पसरली आहे. या बाबत पालिका प्रशासन तसेच आरोग्य विभाग देखील ...