Posts

Showing posts from May, 2023

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी

Image
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी तळोदा : कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध झाली असून आज सभापती व उपसभापती बाबत  निवडणूक घेण्यात आली .   दरम्यान  भाजप व राष्ट्रवादी यांची युती या ठिकाणी पाहायला मिळाली बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत आमदार राजेश पाडवी व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यात राजकीय समन्वय प्रथमच पाहायला मिळाला असल्याने दोघ पिता व पुत्र मधील राजकीय तणाव संपले असल्याचे उघड झाले आहे . या निवडणुकीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हितेंद्र क्षत्रिय उप सभापती पदावर निवड करण्यात आली. बाजार समितीची इमारतीत या वेळी संचालक मंडळ उपस्थित होते.  सर्व पक्षीय फॉर्म्युला असा ठरला - भाजप ९ राष्ट्रवादी काँग्रेस ६ शिवसेना १ ठाकरे सेना १   काँग्रेस १ या निर्णयात  आमदार राजेश पाडवी माजी आमदार उदेसिंग पाडवी माजी मंत्री पदमाकर वळवी.  आमदार आमश्या पाडवी  माजी नगरअध्यक्ष भरत माळी अश्या सर्व पक्षीय नेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. असे असले तरी ब...