Posts

Showing posts from January, 2022
Image
  तळोद्यात विषय समित्यांचे धक्कादायक निकाल कालीचरण सूर्यवंशी  ✒️           पालिकेच्या विविध विषय समित्यांचा झालेल्या निवड प्रक्रियेत बांधकाम सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदी सुनैना उदासी यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार गिरीष वखारे यांनी घोषित केले.   या बैठकित भाजपचे गटनेते भास्कर मराठे, सुनैना उदासी हे उपस्थित होते. तर काँग्रेसचे गटनेते गौरव वाणी, संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, कल्पना पाडवी, काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक जितेंद्र माळी यासह शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे उपस्थित होते. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणुकित भाजपच्या सत्ताधारी पक्षाचे ९ नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभापती पदाची निवड बिनविरोध झाली. पालिकेचे कर्मचारी  राजेंद्र माळी अश्विन परदेशी नितीन शीरसाठ यांनी काम पाहिले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी सभेवर लक्ष ठेवून होते...           विशेष...