
अनूप उदासी शिवसेनेत दाखल होणार ? 🚩 निझर इथं गुप्त बैठकित निर्णयाची चर्चा कालीचरण सूर्यवंशी ✒️ तलोद्यातील माजी उपनगराध्यक्ष तसेच भाजपात राहून देखील सेना स्टाईल ने सडेतोड राजकीय भाष्य करणारे आक्रमक नेतृत्व म्हणून परिचित असणारे नेते माजी उपराध्यक्ष अनूप उदासी व गेल्या अनेक वर्षांपासून एकच झेंडा हातात घेऊन शहरात संघटन टिकविण्यासाठी संघर्ष करणारे दोन नेते शहर प्रमुख जितेंद्र दुबे शिवसेना स्थापना पासुन सोबत असणारे जेष्ठ नेते संजय पटेल , पूर्व श्रमीचे व नुकतेच भाजाप जिल्हाअध्यक्ष पद सोडून शिवसेनेत आलेले आनंद सोनार यांची एक गुप्त बैठक गुजरात राज्यात निझर इथं पार पडली असून यावेळी काय चर्चा झाली हे गुपित असलं तरी संभाव्य चर्चा अशी असू शकते - पूर्व श्रमीचे पक्के सैनिक म्हणून वाटचाल करणारे यांनी मागील निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्ष कडून एन वेळी कुटुंबातील सदस्य ला उमेदवारी देत निवडणूक लढवली व जिंकली देखील मात्र संघटन पदाधिकारी व पालिकेत गटात सतत वैचारिक मतभेदा...