
पप्पा चरण स्पर्श......... कालीचरण सुर्यवंशी/तळोदा शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी तसेच माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्यात असणारे असलेले राजकीय मतभेद हे सर्वश्रुत आहेत दरम्यान नुकताच झालेल्या एका साखरपुड्याच्या खाजगी कार्यक्रमात दोघ दिग्गज आमंत्रित होते या ठिकाणी उपस्थिती असताना आमदार राजेश पाडवी यांनी उदयसिंग पाडवी यांना वाकून नमस्कार केल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू होती साहेब आणि दादांमधील वितूष्ट मिटले,असा कयास यामुळे लावण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे की,तळोदा-शहादा मतदारसंघांमध्ये मागील काळात माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी पाच वर्ष भरपूर निधी आणून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते दरम्यान मागील विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळेल असा अंदाज असताना वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या राजकीय घडामोडी तसेच स्थानिक राजकीय घडामोडी या कारणांमुळे उदेसिंग पाडवी यांचे तिकीट त्यांना न देता त्यांचे सुपुत्र मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांना दिले गेले तिकीट दिल्यानंतर माजी आमदार उदेसिंग पाडवी...